01 March 2021

News Flash

राज ठाकरे यांची ‘फेसबुक’वर धडाक्यात एन्ट्री; RajThackerayOnFB हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंड लिस्टमध्ये

ट्विटरवरही राज यांचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो आहे.

RajThackerayOnFB : सध्या ट्विटरच्या भारतातील ट्रेंड लिस्टमध्ये RajThackerayOnFB हॅशटॅग चौथ्या स्थानावर आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे बहुचर्चित फेसबुक पेज गुरूवारी सुरू झाले. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर राज यांच्या फेसबुक पेजची प्रचंड चर्चा रंगली होती. अखेर आज ही उत्सुकता संपुष्टात आली. रविंद्र नाट्यमंदिरातील एका कार्यक्रमात हे फेसबुक पेज लॉन्च करण्यात आले. राज यांची फेसबुकवरील एन्ट्री धडाक्यातच झाली आहे, असे म्हणावे लागेल. कारण, पेज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्याला तब्बल साडेचार लाख लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय, ट्विटरवरही राज यांचा मोठा बोलबाला पाहायला मिळतो आहे. सध्या ट्विटरच्या भारतातील ट्रेंड लिस्टमध्ये RajThackerayOnFB हॅशटॅग चौथ्या स्थानावर आहे.

राज ठाकरे त्यांच्या व्यंगचित्रांच्या कौशल्यासाठी ओळखले जातात. राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी राज ठाकरे यांची हीच व्यंगचित्रे आता फेसबुकवर पाहता येणार आहेत. त्यामुळे आता राज यांच्या ‘ठाकरी’ फटकाऱ्यांचा ‘फटका’ कोणाकोणाला बसणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राज ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून थेट तरुणांशी जोडले जाणार आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांबद्दल तरुणांच्या मनात मोठी उत्सुकता असून मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लॉन्च करण्यात आलेला टीझर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 12:07 pm

Web Title: mns chief raj thackeray fb page launched rajthackerayonfb
Next Stories
1 चेंबूर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेलरोको; हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प
2 जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री शकिला यांचे निधन
3 चिखलात रूतलेलं विमान बाहेर काढण्यात यश; मुंबई विमानतळावरील सर्व उड्डाणे सुरू
Just Now!
X