News Flash

राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर उपस्थित राहणार

येत्या २ डिसेंबर रोजी कांदिवलीतील बुराभाई हॉल येथे उत्तर भारतीय महापंचायतीचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

परप्रांतियांविरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे लवकरच उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

येत्या २ डिसेंबर रोजी कांदिवलीतील बुराभाई हॉल येथे उत्तर भारतीय महापंचायतीचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ते या कार्यक्रमात उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. दि. १२ ऑक्टोबर रोजी ठाकरे यांना उत्तर भारतीय महापंचायतीने कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी राज यांनी आयोजकांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते. परंतु, आता संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारल्याचे जाहीर केले आहे.

उत्तर भारतीयांविरोधातील नेते अशीच राज ठाकरे यांची देशभरात प्रतिमा आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधला होता. आता ते उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली भूमिका मांडणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 8:42 am

Web Title: mns chief raj thackeray will attend north indian community function at kandivali
Next Stories
1 संघ परिवाराच्या अयोध्येतील ‘हुंकार रॅली’चा मुहूर्त २५ नोव्हेंबरचाच कसा? : शिवसेना
2 राम कदमांचा डॅमेज कन्ट्रोलसाठी ‘ओडोमॉस’ फंडा?, पहा व्हिडिओ…
3 ‘जीएसटी’चा परिणाम सहा महिन्यांपुरताच!
Just Now!
X