05 March 2021

News Flash

मनसेच्या नगरसेवकाची कंत्राटदारास मारहाण

पाण्याची नादुरुस्त असलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यास विलंब झाल्याबद्दल कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक नितीन निकम यांनी एका खासगी कंत्राटदारास अनेक लोकांसमोर मारहाण केल्याचे वृत्त

| December 3, 2012 03:13 am

पाण्याची नादुरुस्त असलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यास विलंब झाल्याबद्दल कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक नितीन निकम यांनी एका खासगी कंत्राटदारास अनेक लोकांसमोर मारहाण केल्याचे वृत्त आहे.
डी.जी.पाटील हे कंत्राटदार ६५ वर्षांचे असून निकम यांनी त्यांना मारहाण केल्याचे दृश्य दूरचित्रवाणीच्या वृत्तवाहिन्यांवरून सातत्याने दाखविण्यात येत होते. पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे खासगी कंत्राटदार आहेत.
 गणेशवाडी भागात सध्या पाण्याचा तुटवडा असून पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमध्ये निर्माण झालेला बिघाडच त्यास कारणीभूत ठरल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार होती.  याप्रकरणी पाटील यांच्याकडे दुरुस्तीसंबंधी तक्रारी करूनही दाद मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या निकम यांनी त्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात आले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 3:13 am

Web Title: mns corporator slaps contractor over water shortage
टॅग : Corporator,Mns
Next Stories
1 ‘नीट’साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
2 इंदू मिलप्रश्नी गायकवाड यांचा उपोषणाचा इशारा
3 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची मनमानी
Just Now!
X