सब टिव्हीवरची मालिका तारक मेहता का उलटा चष्मा पुन्हा एकदा वादात सापडलेली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात, या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असून…सब टिव्हीने याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.
मुंबईची भाषा हिंदी ?!?@MarathiRT @Mazi_Marathi @MarathiBrain @Marhathi @marathi_bola @South_Indians @AsitKumarrModi @TMKOC_NTF @sabtv #stophindiimposition #मराठीबोलाचळवळ #मराठी #म pic.twitter.com/54cKR8qmui
— Shubham Botre (@shubhammbtr) March 3, 2020
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मनसेची भूमिका मांडत, हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता असल्याचं म्हटलं आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 3, 2020
मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटत असल्याचं खोपकरांनी म्हटलंय.
या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापुजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. यादरम्यान…बापुजींच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सब टिव्ही काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2020 2:25 pm