News Flash

‘चौकशा मागे लावून विरोधी पक्ष संपवण्याचा सरकारचा डाव, लोकशाही धोक्यात’; ‘मनसे’चा पवारांना पाठिंबा

'अनंत यक्षप्रश्न सरकारपुढे असताना त्यांना हे घाणेरडे राजकारण सुचत आहे'

'मनसे'चा पवारांना पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयाला आज भेट देणार आहेत. दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. याच पार्श्वभूमीवर विविध पक्षातील नेत्यांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनाही इन्स्ताग्रामवरुन या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा तपास सक्तवसूली संचालनालयाकडे देऊन सरकार काय संदेश देत आहे?,’ असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.

इन्स्ताग्रामवर नांदगावकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांच्या फोटोवर ‘शरद पवारांवरील कारवाई सूडबुद्धी?’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. ‘राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे, राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारं हे प्रकरण आता सक्तवसूली संचालनालयाने घेतलं असून त्या प्रकरणाची पूर्ण छाननी न करता त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष मा. शरद पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या ५ वर्षांपासुन भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे व २०११ सालापासून ह्या प्रकरणावर तपास चालू आहे असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा तपास सक्तवसूली संचालनालयाकडे देऊन सरकार काय संदेश देत आहे?,’ असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे.

तसेच ही कारवाई मुद्दाम निवडणुकांच्या आधीच केली जात असल्याचेही नांदगावकर यांनी म्हटले आहे. ‘विरोधीपक्षातले नेते स्वतःकडे ओढून घ्यायचे आणि उरलेल्यांना अशा सरकारी तपास यंत्रणांची चौकशी मागे लावायची जेणेकरून विरोधीपक्षचं शिल्लक नाही राहिला पाहिजे असा सरकारचा डाव आहे. अशा प्रकारचा घाणेरडं राजकारण बघून देशात लोकशाही जिवंत आहे कि नाही हा प्रश्न पडतो? बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतमालाचा भाव, निर्यात रोडावणे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक अडचणीत येणे, थकीत कर्जाचे प्रमाण वाढणे असे अनंत यक्षप्रश्न सरकारपुढे असताना त्यांना हे घाणेरडे राजकारण सुचते हे लोकशाहीला खूप घातक आहे,’ अशी टीका नांदगावकर यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे, राज्य शासनाच्या अखत्यारीत असणारं हे प्रकरण आता सक्तवसूली संचालनालयाने घेतलं असून त्या प्रकरणाची पूर्ण छाननी न करता त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष मा. शरद पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या ५ वर्षांपासुन भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे व २०११ सालापासून ह्या प्रकरणावर तपास चालू आहे असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा तपास सक्तवसूली संचालनालयाकडे देऊन सरकार काय संदेश देत आहे? विरोधीपक्षातले नेते स्वतःकडे ओढून घ्यायचे आणि उरलेल्यांना अशा सरकारी तपास यंत्रणांची चौकशी मागे लावायची जेणेकरून विरोधीपक्षचं शिल्लक नाही राहिला पाहिजे असा सरकारचा डाव आहे. अशा प्रकारचा घाणेरडं राजकारण बघून देशात लोकशाही जिवंत आहे कि नाही हा प्रश्न पडतो? बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतमालाचा भाव, निर्यात रोडावणे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक अडचणीत येणे, थकीत कर्जाचे प्रमाण वाढणे असे अनंत यक्षप्रश्न सरकारपुढे असताना त्यांना हे घाणेरडे राजकारण सुचते हे लोकशाहीला खूप घातक आहे. #बाळा #नांदगावकर #बाळानांदगावकर #मनसे #bala #nandgaonkar #balanandgaonkar #mns #ncp #sharadpawar #india #maharashtra #pune #mumbai #nashik

A post shared by Bala Nandgaonkar (@bala_nandgaonkar) on

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 12:36 pm

Web Title: mns leader bala nandgaonkar comes in support of sharad pawar scsg 91
Next Stories
1 पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे सर्वसामान्यांची कोंडी; ठाणे, वाशी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
2 “महाराष्ट्राने याआधी सुडाचं राजकारण पाहिलं नाही”, शिवसेनेचं शरद पवारांना समर्थन
3 ‘माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं ऐकणार नाही;’ आव्हाडही ईडी कार्यालयावर धडकणार
Just Now!
X