News Flash

आदिवासी पाड्यातील मनसैनिकाच्या घरी जमिनीवर बसून जेवले राज ठाकरे

राज ठाकरे यांनी पालघर येथील आदिवासी पाड्यात जाऊन मनसैनिक रवी जाधव यांच्या घरी जेवण केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आपला दौरा सुरु केला आहे. ते सध्या पालघरमध्ये आहेत. त्यांनी नुकतीच ट्विटरवरही एंट्री घेतली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राज ठाकरे यांनी पालघर येथील आदिवासी पाड्यात जाऊन मनसैनिक रवी जाधव यांच्या घरी जेवण केल्याचा फोटो ट्विट केला आहे. सध्या या फोटोची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

राज ठाकरे हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या कुंतल या गावात ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव यांच्या घरी खाली बसून जेवले. रवी जाधव यांचे घर आदिवसी पाड्यात आहे, तिथे जाऊन रवी जाधव यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी जेवण केले. या फोटोत त्यांच्या शेजारी बाळा नांदगावकरही दिसत आहेत. तर मनसेचे इतर नेतेही या फोटोत दिसत आहेत.

राज ठाकरे यांनी ट्विटर एंट्री घेताच त्यांचे ट्विटरवरचे फॉलोअर्स वाढले होते. आता या फोटोलाही नेटकऱ्यांनी अनेक लाइक्स दिले आहेत. या आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अनेकदा दलित बांधवांच्या घरी किंवा कोणा कार्यकर्त्याच्या घरी जाऊन जेवण केले आहे. राज ठाकरे यांनी याच नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकत मनसे कार्यकर्त्याच्या घरी जाऊन जेवण केले. लंच डिप्लोमसीमुळे माणसे जवळ येतात असे म्हणतात. आता राज ठाकरेही ही पद्धत अवलंबत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 5:11 am

Web Title: mns leader raj thackery lunch with party worker home at palghar
Next Stories
1 चौकशीच्या फेऱ्यात सिंचन प्रकल्प अडकले
2 महाराष्ट्रातील चंद्रपूर व बल्लारशहा ‘सर्वाधिक सुंदर’ रेल्वे स्थानके
3 राज्य प्रशासनात ‘बदल्यांची लाट’!
Just Now!
X