News Flash

बसच्या गर्दीत करोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?; मनसेचा सरकारला सवाल

नागरिकांकडूनही झाली होती रेल्वे सुरू करण्याची मागणी

राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून सुरू असलेलं लॉकडाउन अद्यापही कायम आहे. ट्रेनमध्ये होणारी गर्दी पाहता लॉकडाउनदरम्यान रेल्वेसेवा आणि अन्य सार्वजनिक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अनेकांची कार्यालयेही सुरू झाली आहेत. ट्रेननं प्रवास करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना रेल्वेसेवा सुरू नसल्यामुळे बसनं किंवा अन्य वाहनानं प्रवास करावा लागत आहे. अशातच या सेवांवरही त्यामुळे मोठा ताण पडत असल्याचं दिसून येत आहे. आता यावरून मनसेनं राज्य सरकारला सवाल केला आहे. तसंच सरकारला इशाराही दिला आहे.

“बसच्या गर्दीत करोना होत नाही पण रेल्वेच्या गर्दीत होतो असा सरकारचा समज आहे का?,” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. “तसंच रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रेल्वे सुरू करण्याची मागणी

साधारण सहा महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे सेवामुळे अनेक नागरिकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. तसेच अनेक नागरिक उत्पन्नाचा मोठा वाटा केवळ वाहतूक करण्याकरिता खर्च करत असल्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता रेल्वे सेवा सुरू करण्याची वेळ आली असून ती लवकरच सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 3:41 pm

Web Title: mns leader sandeep deshpande shares video on twitter bus full of passenger start local trains coronavirus jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “माझं ऑफिस तोडून लोकांचा रोजगार हिरावणारे बेरोजगार दिवस साजरा करत आहेत”
2 छत्रपती शिवरायांचा फोटो पोस्ट करत उर्मिला मातोंडकर यांचं कंगनाला उत्तर
3 Video : वाळकेश्वरचं प्रभू रामाशी असलेलं ऐतिहासिक नातं
Just Now!
X