महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. आज राज ठाकरे आपली भूमिका मांडणार असून ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नव्या झेंड्याचं अनावरण
मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेने याआधी अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवला होता.

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
bombay hc declare sawantwadi dodamarg corridor as ecologically sensitive
अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

Live Blog

17:42 (IST)23 Jan 2020
मला मिळणारा सन्मान राज ठाकरेंमुळेच-राजू पाटील

मी मनसेचा एकमेव आमदार आहे, मात्र महाराष्ट्रात मला जो काही मान मिळतो आहे त्याचं कारण राज ठाकरेच आहेत असं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर राज्यातल्या संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांचे प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे 

17:01 (IST)23 Jan 2020
गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळालीच पाहिजेत-मनसे

गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळालीच पाहिजेत अशी भूमिका मनसेने घेतली आहे. एवढंच नाही तर गिरणी कामगारांसाठी जे ४४ कायदे आहेत ते आता कालबाह्य ठरले आहेत. त्यांचा पुनर्विचार गरजेचा आहे असंही मनसेचे गजानन राणे यांनी म्हटलं आहे

16:16 (IST)23 Jan 2020
घुसखोरांना देशाबाहेर हाकला-किशोर शिंदे

घुसखोरांना बाहेर हाकला असं आवाजनह मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांनी केलं आहे. मनसेच्या मेळाव्यात ते बोलत होते

15:10 (IST)23 Jan 2020
शहरनियोजनाचं मंथन व्हायला हवं : संदीप देशपांडे

"भौगोलिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा तीन स्तरावर शहरनियोजनचं मंथन व्हायला हवं. महानगरपालिकांमध्ये उच्चशिक्षित शहर नियोजकांची नियुक्ती व्हायला हवी. विकासकामांसाठी आर्थिक स्रोत निर्माण करावेच लागतील," असं मत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं.

14:17 (IST)23 Jan 2020
राज ठाकरे कायम पाठिशी : रिटा गुप्ता

"गेली ८ वर्ष आम्ही आरोग्यक्षेत्रात कार्यरत आहोत. कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याची, कर्करोग निदानाची शिबिरं घेतली. हे सर्व करताना राज ठाकरे हे संपूर्ण मोहिमेच्या पाठीशी ठाम उभे होते,' असं मत मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी व्यक्त केलं.

13:35 (IST)23 Jan 2020
राज ठाकरेंनी केलं नव्या झेंड्याचं अनावरण

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. 

13:08 (IST)23 Jan 2020
शॅडो कॅबिनेटद्वारे मनसेचा सरकारवर वॉच

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेतर्फे शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली.

13:05 (IST)23 Jan 2020
पद नव्हतं तरी काम करत होतो : अमित ठाकरे

पद नव्हतं तेव्हाही काम करत होतो. मला या ठिकाणी जबाबदारी देण्यात येईल याची काहीही कल्पना नव्हती. वडिलांशी चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठरवणार असल्याचं मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केलं. अमित ठाकरे यांची आज मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

12:30 (IST)23 Jan 2020
अमित ठाकरेंनी लोकांच्या भल्यासाठी काम करावं : शर्मिला ठाकरे

अमित ठाकरे यांची आज मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे भावूक झाल्याचं पहायला मिळालं. अमित ठाकरे यांनी लोकांच्या भल्यासाठी काम करावं, पदांचा विचार करू नये. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहे. कुणाशीही तुलना करण्यापेक्षा काम महत्त्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या.

12:01 (IST)23 Jan 2020
राज ठाकरे म्हणजे 'जाणता राजा' : संजय नार्वेकर

चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष व अभिनेते संजय नार्वेकर यांनी 'सांस्कृतिक महाराष्ट्र' हा तृतीय ठराव मांडला. "गडकिल्ले संवर्धन, नाट्यगृहांची दुरावस्था सुधारावी. प्रायोगिक रंगभूमी जोपासणं ती वृद्धिंगत करणं गरजेचं, मराठी चित्रीकरणासाठी एक खिडकी परवानगी कक्ष स्थापन व्हावा आणि मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान मिळालंच पाहिजे, त्यासाठी आम्ही कार्यरत राहू", असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा जाणता राजा असा उल्लेख केला.

11:48 (IST)23 Jan 2020
महिलांसाठी मनसेतर्फे मनसे रक्षाबंधन सबलीकरण पथक

महिलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांचा दबलेला आवाज निडरपणे मांडण्यासाठी महिला महाराष्ट्र सैनिकांतर्फे 'मनसे रक्षाबंधन सबलीकरण पथक' तालुकानिहाय स्थापन केलं जाणार असल्याची माहिती मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी दिली.

11:26 (IST)23 Jan 2020
झेंड्याला विरोध करणाऱ्यांना मनसेचं खणखणीत उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवमुद्रा असलेल्या नव्या भगव्या झेंड्याचं आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याहस्ते अनावरण करण्यात आलं. मनसेच्या या झेंड्याला अनेक स्तरातून विरोध करण्यात आला होता. मनसेकडून आता यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

10:50 (IST)23 Jan 2020
मनसेचं महाअधिवेशन लाईव्ह

10:41 (IST)23 Jan 2020
पक्षाने अनेक निर्भीड भूमिका घेतल्या : अभ्यंकर

आजवर पक्षाने अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनेक निर्भीड राजकीय भूमिका घेतल्या, तडफेने आंदोलनं केली.  जेट कर्मचाऱ्यांना न्याय देणारं आंदोलन, मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान चित्रपटगृहांत मिळवून दिलं, आझाद मैदानावर धर्मांधांनी जेव्हा धुडगूस घातला तेव्हा बेधडकपणे आपण मोर्च्याने त्याला उत्तर दिलं होतं, असं अविनाश अभ्यंकर म्हणाले.

10:39 (IST)23 Jan 2020
राज ठाकरे म्हणजे एक न्यायमंदिर : अविनाश अभ्यंकर

राज ठाकरे म्हणजे हे एक न्यायमंदिर आहेत. त्यांनी अनेकांना न्याय देण्याचे प्रयत्न केले आहेत. मनसेकडून जनतेला अनेक अपेक्षा आहेत. राज ठाकरे यांनी कोणतंही राजकारण स्वत:साठी केलं नाही. मी आज मला महाराष्ट्रासाठी अर्पण करतो असं म्हटलं होतं. हा त्यांचा खरेपणा आहे. त्यांनी जनतेसाठी शेकडो केसेस आपल्या अंगावर घेतल्या, असं मत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी व्यक्त केलं.

10:27 (IST)23 Jan 2020
मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा कसा असेल याची अनेकांना उत्सुकता होती. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवमुद्रा असलेल्या नव्या झेंड्याचे अनावरण केलं.

09:57 (IST)23 Jan 2020
येत्या काळात मनसेची ताकद दिसेल : अमेय खोपकर

येत्या काळात आम्हाला आंदोलनाची गरज पडणार नाही. या अधिवेशनानंतर महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद दिसेल, असं मत मनसे नेते अमेय खोपकर यांनी व्यक्त केलं.

09:23 (IST)23 Jan 2020
मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा

मनसेच्या महाअधिवेशनात व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे फोटो ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

09:19 (IST)23 Jan 2020
अमित ठाकरेंना जबाबदारी दिल्यास आनंद : शर्मिला ठाकरे

सर्वांच्या नजरा अमित ठाकरे यांच्याबद्दल काय घोषणा होणार याकडेही आहेत. अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी सोपवल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

09:16 (IST)23 Jan 2020
अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग ? मनसे नेत्याने केलं स्पष्ट

सर्वांच्या नजरा अमित ठाकरे यांच्याबद्दल काय घोषणा होणार याकडेही आहेत. अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

09:14 (IST)23 Jan 2020
आज मनसे अधिवेशनात काय होणार? जाणून घ्या ५ मुद्दे
09:00 (IST)23 Jan 2020
राज ठाकरे नेस्को संकुलाकडे रवाना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे व आई कुंदा ठाकरे यांच्यासोबत नेस्को संकुलाकडे रवाना झाले आहेत.