22 September 2020

News Flash

मुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा मोर्चा

मनसे कार्यालया समोरील फुटपाथवर फेरीवाल्यांना बसण्यास देण्यात आली आहे जागा

संग्रहित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. मनसेचं मुख्यालय असलेल्या राजगड पासून हा मोर्चा निघालेला आहे. दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत, नुकतच ते पुण्यातून औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.

महापालिकेच्या नव्या फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांना बसण्यासाठी काही ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील एक ठिकाण मनसेचं मुंबईतील मुख्यालय असेलल्या ‘राजगड’ च्या समोरील फुटपाथचं देखील आहे. या ठिकाणापासून ते दादरच्या दिशेपर्यंत सर्व फेरीवाले बसणार आहेत. मनसेने फेरीवाल्यांच्याविरोधात या अगोदरही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

केवळ राजगड समोरच फेरीवालं बसत आहेत, हे एकच या मोर्चामागील कारण नाही. त्याचबरोबर महापालिकेने फेरीवाल्यांसाठी इतरही ज्या जागा निश्चित केलेल्या आहेत.तेथील नागरिकांचा देखील यास विरोध आहे. प्रशासनाने नागरिकांना, सर्वसामान्य रहिवाशांना विश्वासात न घेता हे निर्णय परस्पर मनमानी पद्धतीने जाहीर केलेले आहेत. त्यांना जो नागरिकांचाविरोध आहे हा विरोध त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आज आम्ही निघालो आहोत. असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 12:50 pm

Web Title: mns march against the mumbai municipal ferrywala policy msr 87
Next Stories
1 राज्यात ‘एनपीआर’ १ मेपासून
2 ‘कोमसाप’च्या कारभाराला कलहाचा कलंक
3 ‘एमटीएनएल’मधील कंत्राटी भरतीसाठी ५५ कोटी
Just Now!
X