पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी होणार आहे. मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी होत मोर्चाला पाठिंबा दिला आहे. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.

Live Blog

19:07 (IST)09 Feb 2020
Video : राज ठाकरे यांचं खणखणीत भाषण येथे पाहा


संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा...

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/4UKalUTa-BM" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

16:54 (IST)09 Feb 2020
मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाही -राज ठाकरे

घुसखोरांविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात बोलताना राज ठाकरे यांनी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना इशारा दिला. "देशात  आता सफाई करण्याची वेळ आली आहे. आता तर नायजेरियनही येऊ लागलेे आहेत. उद्या हेच तुमच्यावर हात उचलतील. बाहेरून आलेल्या लोकांनामुळे बॉम्बस्फोट, दंगली होत आहे. मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाही," असं राज ठाकरे म्हणाले.

16:44 (IST)09 Feb 2020
दगडानं दगडाला अन् तलवारीला तलवारीनं उत्तर देऊ -राज ठाकरे

"जो देशात राहणाऱ्या माणसांना बाहेर काढले जाणार नाही. इथला आदिवासी इथेच राहणार आहे. मोर्चे काढणाऱ्यांनी आजचा मोर्चा बघावा आणि एकोप्यानं राहावं. नाहीतर इथून पुढे दगडाला दगडानं आणि तलवारीला तलवारीनं उत्तर देऊ," असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

16:42 (IST)09 Feb 2020
आर्थिक अराजकता लपवण्यासाठी कायदा आणला का?

"देशात सीएए, एनआरसीवरून गोंधळ सुरू आहे. पण, केंद्र सरकारलाही विचारणार आहे. देशात सध्या जी आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. ती अराजकता लपवण्यासाठी हा कायदा करत आहात का? हे आधी स्पष्ट करावं," असंही राज ठाकरे म्हणाले.

16:38 (IST)09 Feb 2020
राज ठाकरे यांचे Live भाषण येथे पाहा

राज ठाकरे यांचे Live भाषण येथे पाहा

16:35 (IST)09 Feb 2020
भारतानं माणुसकीचा ठेका घेतलेला नाही -राज ठाकरे

"पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूवर अत्याचार होत आहेत. पाकिस्तानातील मुस्लिमांना भारतात नागरिकत्व देण्याची काय गरज? माझा देश धर्मशाळा आहे का? माणुसकीचा भारतानं घेतलेला नाही?," असं ठाकरे म्हणाले.

16:33 (IST)09 Feb 2020
सरकारची स्तुती केली, तर भाजपाचा समर्थक? -राज ठाकरे

"आपल्या देशात उजवा किंवा डावा इतकंच सुरू आहे. जे चांगलं त्याला चांगलं म्हणालो. जे वाईट होतं त्याच्यावर टीका केली. केंद्र सरकारच्या निर्णयावर मी टीका केली, त्यावेळी मला भाजपा विरोधक ठरवण्यात आलं. आता भाजपाचं समर्थक ठरवलं जात आहे," असं राज ठाकरे म्हणाले.

16:30 (IST)09 Feb 2020
या देशातील मुस्लिमांना कोण देशातून काढतंय -राज ठाकरे

"सीएए आणि एनआरसीवरून देशभरात मुस्लिमांनी मोर्चे काढले. मला या मोर्चांचा अर्थच लागत नाही. देशातील मुस्लिमांना कोण हाकलणार आहे. कायद्याबद्दल माहिती नसणारेही कसे बोलत आहे?," असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

16:26 (IST)09 Feb 2020
अरे मी काय ट्रेन आहे का? -राज ठाकरे

आझाद मैदानात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात. "काही जण मला म्हणत होते की, ११.५५ मिनिटांनी येणार आहे? मी त्यांना बोललो मी काय ट्रेन आहे का वेळेवर यायला? वेळ लागतो," अशी उत्तर राज ठाकरे यांनी टीकाकारांना दिलं. 

16:12 (IST)09 Feb 2020
मोर्चा आझाद मैदानाजवळ

पाकिस्तान व बांगलादेशातील घुसखोरांना देशातून बाहेर काढण्याच्या मागणीसाठी मनसेनं काढलेल्या मोर्चामुळे हिंदू जिमखाना ते आझाद मैदान मार्ग भगवामय होऊन गेला होता. थोड्याच वेळात मोर्चा आझाद मैदानात दाखल होणार असून, राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

15:17 (IST)09 Feb 2020
मोर्चाला आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदू जिमखान्यावर दाखल झाल्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाला आहे. आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर राज ठाकरेंसह महत्त्वाचे नेते महापालिका मार्गावरून आझाद मैदानात प्रवेश करतील, तर मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावर असलेल्या तीन गेटमधून मैदानात जातील. 

15:01 (IST)09 Feb 2020
राज ठाकरे हिंदू जिमखान्यावर दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे अखेर हिंदू जिमखाना येथे दाखल झाले आहेत. मोर्चाला येण्यापूर्वी ठाकरे यांनी सपत्नीक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दुसरीकडे हिंदू जिमखाना परिसरा भगव्या रंगानं फुलून गेला आहे. 

14:06 (IST)09 Feb 2020
मोर्चाच्या स्वागतासाठी आझाद मैदान सज्ज

हिंदू जिमखाना येथून निघणारा मनसेच्या मोर्चाचा आझाद मैदानात समारोप होणार आहे. याठिकाणी राज ठाकरे मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी आझाद मैदानात व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. 

13:43 (IST)09 Feb 2020
राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी

निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्चाच्या ठिकाणी जाण्याआधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे याही त्यांच्यासोबत होत्या. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता राज ठाकरे मोर्चासाठी रवाना झाले आहेत. 

13:32 (IST)09 Feb 2020
राज ठाकरे हिंदू जिमखान्याकडं रवाना; थोड्याच वेळात मोर्चाला सुरूवात

पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणीसाठी मनसेनं 'चले जाव' अशी घोषणा देत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात मोर्चा सुरू होत असून, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हिंदू जिमखान्याकडं रवाना झाले आहेत. 

13:09 (IST)09 Feb 2020
आम्ही हिंदुत्व कधीही सोडलं नाही -शर्मिला ठाकरे

मोर्चा निघण्यापूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसेनं भूमिका बदलल्याच्या प्रश्नावर बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "मनसेनं कधीही हिंदुत्व सोडलं नाही. गेली तेरा वर्ष मनसेनं हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. रझा अकादमीच्या विरोधात मनसेनंच आंदोलन केलं होतं," असं त्या म्हणाल्या. 

12:14 (IST)09 Feb 2020
राज ठाकरे सहकुंटुंब होणार सहभागी

मनसेच्या मोर्चाला हिंदू जिमखान्यापासून थोड्याच वेळात सुरूवात होत असून, राज ठाकरे हे स्वतः मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुंटुंबही मोर्चात सहभागी होणार आहे. मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते मोर्चाच्या स्थळी पोहोचले आहेत. 

11:52 (IST)09 Feb 2020
तेरा वर्ष भाजपानं पोसलं नाही

मनसेचा घुसखोरांविरूद्धचा मोर्चा भाजपा पुरस्कृत असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली होती. त्याला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं. "तेरा वर्ष आमचा पक्ष भाजपानं पोसलेला नाही. आमच्या मोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच अशा पद्धतीनं टीका केली जात आहे. पण, त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. आम्ही मोर्चातून उत्तर देऊ," असं नांदगावकर म्हणाले.

11:32 (IST)09 Feb 2020
हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल

पाकिस्तान, बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना देशातून बाहेर काढण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरूवात होत असून, नाशिक, औरंगाबाद, पुण्यासह राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. 

10:33 (IST)09 Feb 2020
मनसे कार्यकर्त्यांकडून राम मंदिरात आरती

मनसेचा मोर्चा सुरू होण्यास अजून तासाभराचा अवधी आहे. त्यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील राम मंदिरात आरती केली. यावेळी संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

10:14 (IST)09 Feb 2020
असा असेल मोर्चाचा मार्ग

गिरगाव चौपाटीजवळील हिंदू जिमखाना येथून मनसेच्या मोर्चाला सुरूवात होईल. शामलदास गांधी मार्गावरून मोर्चा पुढे जाईल. त्यानंतर मेट्रो सिनेमा भागात हा मोर्चा पोहचेल. राज ठाकरेंसह महत्त्वाचे नेते महापालिका मार्गावरून आझाद मैदानात प्रवेश करतील, तर मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावर असलेल्या तीन गेटमधून मैदानात जातील. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांसह पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार आहेत.

09:33 (IST)09 Feb 2020
मोर्चा आधीच भरती सुरू

मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या महामोर्चाच्या एक दिवस अगोदरच माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन यांनी पुन्हा मनसेत घरवापसी केली. तर शिवसेनेतील सुहास दशरथे, नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश कौदगे यांनीही मनसेत प्रवेश केला.

09:16 (IST)09 Feb 2020
या गोष्टी टाळा; मनसेचं कार्यकर्त्यांना आवाहन

मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना काही गोष्टी टाळण्याचं आवाहन पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 'सर्व महाराष्ट्र सैनिक व देशप्रेमी नागरिकांनी एवढ्या मोठ्या मोर्चात खबरदारी घेणं जरुरी आहे. काही जण या मोठ्या मोर्चात वेगळ्या उद्देशानं येतात, त्यांना तशी संधी अजिबात देऊ नये. त्यामुळे सहभागी होणारे कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक यांनी कोणत्याही प्रकारची पिशवी, बॅग, बाटली, मौल्यवान वस्तू आणणे टाळावे. तसेच आपल्या मोबाईलचीही काळजी घ्यावी. मोर्चात कटाक्षाने प्लॅस्टिकचा वापर टाळून निसर्गाची काळजी घेणे जरूरी आहे,' असं आवाहन पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

09:07 (IST)09 Feb 2020
राज्यभरातून कार्यकर्त्यांची गर्दी

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरूद्ध काढण्यात येणाऱ्या मनसेच्या मोर्चा राज्यभरातून लोक सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी अनेकांनी रात्रीच मुंबईची वाट धरली. तर मुंबई आसपास असलेल्या जिल्ह्यांतून सकाळी मनसे कार्यकर्त्यांसह नागरिक मोर्चासाठी रवाना झाले आहेत. या मोर्चाची मनसेनं जोरात तयारी केली असून, मुंबईत सर्वत्र होर्डिग्ज झळकत आहेत.

09:04 (IST)09 Feb 2020
सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे नजर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्ष कार्यकर्ते रविवारी सकाळी मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथे एकत्र जमून आझाद मैदानात जाणार आहेत. आझाद मैदान येथे राज यांची जाहीर सभा होणार आहे. या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनीही तयारी केली आहे. पदयात्रा, सभा यावर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

09:02 (IST)09 Feb 2020
घुसखोरांविरूद्ध महाअधिवेशनात घेतली भूमिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन काही दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलं. या अधिवेशनात पक्षाचे राज ठाकरे यांनी पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविषयी भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्यानंतर मनसे हिंदुत्वाकडे झुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू झाली. विशेष म्हणजे घुसखोरांविरोधात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांचं सीएए आणि एनआरसीला समर्थन असल्याचं बोललं जात होतं. त्यावर राज ठाकरे यांनी नंतर खुलासा केला. आपण घुसखोरांविरोधात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.