बाहेरचे खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यापासून रोखल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी लोअर परेलच्या फिनिक्स मॉलमधल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये जोरदार राडा घातला. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन संतप्त मनसे कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेली असतानाही मनसे कार्यकर्त्यांना बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यापासून रोखण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसे कार्यकर्त्यांनी पीव्हीआर मॉलमध्ये या विरोधात घोषणाबाजी करत जोरदार गदारोळ केला. मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबरही शाब्दीक वादावादी झाली. आपल्यापर्यंत सरकारकडून कोणताही लेखी आदेश पोहोचलेला नाही असे पोलिसांनी त्यांना सांगितले.

१ ऑगस्टपासून बाहेरचे खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेण्यापासून सर्वसामान्यांना रोखल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेने आधीच दिला होता. मागच्या महिन्यात मनसे कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये महागडया दराने विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवरुन मल्टिप्लेक्सच्या सहाय्यक व्यवस्थापकला चोप दिला होता.

अलीकडेच संपलेल्या महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र सिनेमा नियम १९६६ नुसार थिएटरमध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यावर कुठलीही बंदी नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने बाहेरचे खाद्यपदार्थ थिएटर आणि मल्टिप्लेक्समध्ये नेण्याची परवानगी दिली होती.

More Stories onमनसेMNS
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns protest at lower parel phoenix mall
First published on: 06-08-2018 at 18:40 IST