तूरडाळीवरून मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी थेट मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या दालनासमोर जोरदार घोषणा देत आंदोलन केले. याप्रकरणी मनसेचे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह नऊ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून वैयक्तिक हमीवर सोडून दिले.
मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर चारच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली साठेबाज व्यापाऱ्यांवर कारवाईची, तसेच जप्त केलेली डाळ व्यापाऱ्यांना परत न देता शिधावाटप दुकानातून वितरीत करण्याची मागणी करीत घोषणा दिल्या. यापूर्वी नवी मुंबईतील व्यापाऱ्यांच्या गोदामांत साठवलेल्या डाळीची माहिती देऊन मनसेने धाडी टाकायल्या लावल्या होत्या. तसेच मुख्यमंत्र्यांना तूरडाळ देण्याचे अभिनव आंदोलनही केले होते.