रस्त्यावर उतरुन व्यवसाय करायचा म्हटला की, बहुतांश मराठी माणसे लाजतात. हीच लाजेची भावना मनात न बाळगता मराठी माणसाने निर्भिडपणे उद्योग, व्यवसाय सुरु करावा, यासाठी मनसेच्या एका नेत्याने एका वेगळया, अनोख्या पद्धतीने आज शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आज नंदू बागलकर यांच्या भाजी विक्रीच्या स्टॉलवर पोहोचले. त्यानंतर स्वत: नंदू यांच्यासोबत भाजी विक्री करुन त्यांना स्टॉल सुरु केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
नंदू बागलकर हे मनसेचे उपाध्यक्ष असून त्यांनी दादरमध्ये भाजी विक्रीचा नवीन स्टॉल सुरु केला आहे. संदीप देशपांडे यांनी भाजी विक्रीच्या स्टॉलवर एक व्हिडीओ सुद्धा शूट केला व कुठलाही व्यवसाय करताना लाज न बाळगता अभिमान बाळगा असा संदेश दिला. रस्त्यावर उतरून व्यवसाय करण्यासाठी मराठी तरुण-तरुणींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचा व्हिडीओ बनवला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 3:19 pm