करोनामुळे उद्योग, कामधंदे बंद असल्याने अनेकांची अवस्था दयनीय झाली आहे. देशभरात लॉकडाउन घेण्यात आल्यामुले अनेक रोजगार बंद पडले परिणाणी अनेकजण बेरोजगार झाले. अशा संकटाच्या परिस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्याने अस्सल मराठी पिठलं भाकरीचा व्यवसाय सुरू केला आहे. तोही घरपोच सेवा देणारा. दादरमधील मनसेच्या राजगड कार्यलयातील तुषार पाटील या तरूणाने ||वारी|| तृप्त खवय्यांची या नावाने अस्सल मराठी भोजनाची मेजवानी आणली आहे. तुषारने दादर परिसरात घरपोच सुविधा देणारा मराठमोळा ब्रँड तयार केला आहे. मनेसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही या तरूणाचं कौतुक केलं आहे. ‘आमचा सहकारी तुषार पाटील याने पिठलं – भाकरी,ठेचा व वांग्याचे भरीत असा मराठमोळा मेनू घरपोच देण्याचा व्यवसाय आजपासून सुरू केला आहे. एका मराठी तरुणाच्या या उपक्रमास आपण सर्वांनी पाठिंबा देऊन त्याचे मनोबल वाढवूया. मनःपूर्वक शुभेच्छा!!’ असं ट्विट शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.

आपली मराठमोळी खाद्य संस्कृती जपण्याची प्रेरणा माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकांना राज ठाकरे साहेब आणि नितिन सरदेसाई यांच्याकडून मिळाली. ही मराठमोठी खाद्य संस्कृतीकायम जतन करू असे तुषार म्हणाला.

दादर,माहीम,प्रभादेवी येथे विनामूल्य घरपोच सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी ९८७०९२६६२९ या मोबाईल क्रमांकावर ऑर्डर द्या. महत्वाचे म्हणजे किमान दोन किंवा त्याहून अधिक ऑर्डर असायली हवी.

 

पिठलं भाकरी शिवाय..तृप्त खवय्यांची मध्ये सफर खमंग पुरणपोळीची,चविष्ट साजूक तुपातले उकडीचे मोदक,भाजणीचे खुसखुशीत थालीपीठ ,मिसळ-पाव, शिवाय रविवार,बुधवार व शुक्रवारी नॉनव्हेज पदार्थांचीही मेजवानी असणार आहे.तीही घरपोच.