एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेने’ने घोष्त केलेल्या मोर्च्याला आज (शुक्रवार) मुंबई सेंट्रल पासून सुरूवात झाली. मुंबई सेंट्रल ते आझाद मैदान या दरम्यान हा मोर्चा निघणार आहे. या मोर्च्यात अंदाजे पंधरा हजार एसटी क्रमचारी सहभागी झाले आहेत असा अंदाज आहे.
राज्य शासानाने मनसेला मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली असून मोर्चात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यामुळे पोलिस या मोर्चाला अटकाव करणार नाहीत. मात्र, नंतर या मोर्चात सामील असलेल्या मनसेच्या नेत्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  
मोर्च्याची घोषणा झाल्यानंतर गुरुवारपासूनच राज्यभरातल्या एस.टी. च्या आगारामध्ये जाणवायला सुरुवात झाली होती. ग्रामीण भागातील वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे.
कनिष्ठ वेतन श्रेणी तात्काळ रद्द करावी. सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर ४० टक्के ग्रेड पे देण्यात यावा, १७.५ टक्के प्रवासी कर रद्द करावा, टोल-टॅक्स रद्द करण्यात यावा, आणि विविध सवलतीचंी १६८० कोटींची थकबाकी मिळालीच पाहिजे यासह अनेक प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले.