मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यावेळी मनोज पाटील याने आपल्या सुसाईड नोटमध्ये, अभिनेता साहिल खान (Sahil Khan) यांच्यावर आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. अभिनेता साहिल खान मला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप देखील मनोज याने यात केला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. “साहिल खान जर २० सप्टेंबरला मनसे कार्यालयात आला नाही तर त्याला त्या पद्धतीचा इशारा देण्यात येईल”, असा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, मनोज पाटील सध्या कूपर रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

मनोज पाटील आणि साहिल खान यांच्यात मनसे मध्यस्थी करेल, असं देखील मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे. “आम्ही साहिल खानला बोलावून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू. मनोज पाटील यांच्या कुटुंबियांशी बोलून आम्ही विषय समजून घेतलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी साहिल खानला बोलावलेलं आहे. यावेळी, मनोज पाटील आणि साहिल खान यांच्यातील समज-गैरसमज दूर करू”, असं संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

Ajit Pawar, Raj Thackeray,
राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
ashok chavan raj thackeray
राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
Paper leak Examination Malpractices Act Report submitted by Nimbalkar Committee
पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा! निंबाळकर समितीकडून अहवाल सादर
Raj thackeray and amit shah meet
राज ठाकरे- अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं? अजित पवार गटातील नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “देवेंद्र फडणवीस…”

“बॉडी बिल्डर मनोज पाटील याला न्याय नक्की मिळेल”, असा विश्वास देखील संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी मनोज पाटील यांच्या मित्रांना दिला आहे.

त्रास आणि बदनामीमुळे आत्महत्येचं पाऊल

मनोज पाटीलने बुधवारी (१५ सप्टेंबर) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप देखील मनोज पाटीलने केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

व्यावसायिक आणि इतर वादही

मनोज पाटीलच्या कुटुंबाकडून ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आहेत. तसंच दुपारी मनोज पाटीलचं कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची मागणी करणार असल्याची माहिती आहे.