01 December 2020

News Flash

कराची स्वीट्सला ‘मनसे’ दणका; न्यायालयात खेचण्याची तयारी

कराची स्वीट्स विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

मुंबईत ‘कराची स्वीट्स’ नावांचं एख दुकान असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी कराची स्वीट्स दुकानाच्या व्यवस्थापनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
पाकिस्तानातील शहर कराची या नावावर असलेल्या कराची स्वीट्स या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

याबाबत मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी दुकान व्यवस्थापनाला एक पत्र पाठवलं आहे. तसंच संबंधित आस्थापनाला न्यायालयात खेचण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

काय म्हटलंय पत्रात?

देशातील पारंपारिक शत्रू पाकिस्तानातील कराची या नावाचा आधार घेत आपण बहुचर्चित आस्थापन सुरू केलं आहे. त्याचा प्रचार व विस्तार करून भारतीयांचा भावनांना ठेच पोहोचवून व्यवसाय करत आहात. तसंच मराठी भाषेचाही द्वेश करत आहात त्याबाबत आक्षेप आहे, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. तसंच कराची स्वीट्सच्या व्यवस्थापकांना न्यायालयात खेचण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 2:59 pm

Web Title: mns warns karachi sweets shop owner on the of pakistan former capital karachi marathi name jud 87
Next Stories
1 मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे एकत्र?; दरेकर म्हणाले…
2 “मुंबई महापालिकेबाबतचं फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही”
3 “शिवसेनेला सोनियांच्या १० जनपथचे पायपुसणं करणाऱ्या राऊतांनी मुंबईचं नाव घेऊ नये”
Just Now!
X