महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी वादग्रस्त खारघर टोल नाक्यावरील सायन पनवेल टोलवेज कंपनीच्या व्यवस्थापकांना बेदम मारहाण केली. ही घटना सायंकाळी पाच वाजता घडली.
याअगोदर आमच्या नावाची पोलिसांत तक्रार का केली, असे निमित्त काढून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कामोठे येथील मिलींद खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अचानक केले. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी या कार्यालयात टोलवसुलीची आखणी करत असलेले दिनेश साही व राकेश सिंग यांना ही मारहाण झाली. बाटली साही यांच्या थोबाडीत मारल्याने त्यांच्या तोंडावर गंभीर जखम झाली. साही यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले.
या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल केला गेला आहे. याअगोदरही पोलीस ठाण्यात टोलवसुलीचा जाब विचारल्यावर मोटारचालकांनाही मारहाण झाली आहे. मात्र त्यावेळी संबंधित बाऊंसरविरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत.