24 September 2020

News Flash

‘टोल भरू नका’ स्टिकर्स लावणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुलुंडमधील आनंदनगर टोल नाक्यावर 'टोल भरू नका' छापलेले स्टिकर्स लावणा-या मनसे कार्यकर्त्यांना आज (शुक्रवार) मुलुंड नवघर पोलिसांनी अटक केली.

| February 14, 2014 03:35 am

मुलुंडमधील आनंदनगर टोल नाक्यावर ‘टोल भरू नका’ छापलेले स्टिकर्स लावणा-या मनसे कार्यकर्त्यांना आज (शुक्रवार) मुलुंड नवघर पोलिसांनी अटक केली. कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण, विभाग अध्यक्ष योगेश सावंत, सतिश नारकर, नगरसेविका वैष्णवी सिरफारे आदी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिल्यानंतरही, जोपर्यंत सरकार आश्वासनांची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत ‘टोल भरु नका’, असे आवाहन राज ठाकरे यांनी गुरूवारी केले होते. तसेच जबरदस्ती वसुली करणा-या कंत्राटदारांच्या घरी जाऊन आम्ही थैमान घालू असा खणखणीत धमकीवजा इशाराही त्यांनी दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 3:35 am

Web Title: mns workers arrested by police on toll issue
टॅग Mns
Next Stories
1 पवार विश्वासघातकी
2 रेल्वेचा कारभार मनमानी!
3 गारवा आणि शिडकावा!
Just Now!
X