गुजरात दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी माझ्यासमोर चांगलं चित्र उभा केलं, मात्र, ते सगळं खोटं होत. आता मोदींचा खरा चेहरा माझ्या समोर आला आहे. २०१९ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदी मुक्त भारत व्हायला हवा. मोदींच्या परदेश दौऱ्यातून एकही रुपया भारतात आला नाही. मोदी हे केवळ खोटे बोलणारे नेते आहेत. ते जर पुन्हा सत्तेत आले तर देशाची आणखी वाट लागेल. त्यामुळे आता मोदीमुक्त भारतासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ते शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Updates :

  • शिवराय, लोकमान्य टिळक, आंबेडकरांवर एक धडाही पाठ्यपुस्तकात नाही
  • मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास देशाची आणखी वाट लागेल
  • नोटाबंदीची चौकशी झालीच तर हा सर्वांत मोठा भ्रष्टाचार असल्याचे उघड होईल
  • मोदींनी गुजरातींचीच वाट लावली आहे
  • मोदी मुक्त भारतासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे
  • राज्यात ५६ हजार विहीरी बांधल्याचे मुख्यमंत्री खोटं सांगताहेत
  • इस्रोच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रातील ४६ टक्के जमीनीचे वाळवंटीकरण होतंय
  • मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्राचं काय झालं
  • मोदींच्या परदेश दौऱ्यातून एकही रुपया भारतात आला नाही
  • २०१९ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदी मुक्त भारत व्हायला हवा
  • मुंबईतला मेट्रोचा घाट मराठी माणसाला संपवण्यासाठी सुरु
  • मोदींनी गुजरातमधील दौऱ्यात माझ्यासमोर चांगलं चित्र उभं केलं. मात्र, ते खोटं होत. मोदींचा खरा चेहरा आता दिसला.
  • निवडणुकांनंतर राम मंदिर व्हावं, भाजपाने राजकारणासाठी त्याचा वापर करु नये
  • राम मंदिर निश्चित व्हायला पाहिजे
  • पुढच्या काही महिन्यांत राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगली घडतील. तशी माहिती मला मिळाली आहे.
  • बीकेसीतील नोकऱ्या मोदींनी गुजरातला पळवल्या, मुंबईतील एअर इंडियाचे मुख्यालयही मोदींनी दिल्लीला हलवल
  • वसई-विरारमध्ये गुजराती लोकांची संख्या वाढतेय, हाच मोदी-शहांचा डाव
  • १ लाख १० हजारांची बुलेट ट्रेन कोणाला हवीय?
  • महाराष्ट्राच पाणी गुजरातला वळवल जातंय
  • मोदी परदेशातील नेत्यांना प्रत्येक वेळी अहमदाबादच का दाखवतात देशात इतर शहरे नाहीत का?
  • पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री राफेल प्रकरणी ब्र ही काढत नाहीत.
  • राफेल लढाऊ विमान बनवण्याचे कंत्राट रिलायन्सकडे
  • राफेल डील हा बोफोर्सपेक्षा मोठा घोटाळा
  • सरकारचा महाराष्ट्र आणि मराठी माणसांशी घेणं देणं नाही
  • राज्यावर दलाल राज्य करताहेत
  • महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची गोष्ट असेल तर पाठींबा देणार
  • मी विरोधासाठी विरोध करणारा माणूस नाही
  • श्रीदेवीचे पार्थिव राष्ट्रध्वाजात का गुंडाळले?
  • पॅडमॅन आणि टॉयलेट एक प्रेमकथा हे सरकार स्पॉन्सर चित्रपट
  • विरोधकांना संपवायची मोदींची निती
  • माध्यमांचे आणि कोर्टाचे स्वातंत्र्यही सरकारने हिरावून घेतले
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mnss padwa melava live chief minister fadnavis monitor of class raj thackerays criticism
First published on: 18-03-2018 at 20:18 IST