05 March 2021

News Flash

खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, ठाण्यातील युवक जखमी

करण ठाकरे याने नेहमीप्रमाणे आपल्या खिशात मोबाईल ठेवला होता.

Mobile Blast: करण ठाकरे याने नेहमीप्रमाणे आपल्या खिशात मोबाईल ठेवला होता. अचानक त्याच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. संग्रहित छायाचित्र

पँटच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने एका युवकाचा पाय भाजला आहे. करण ठाकरे असे जखमी युवकाचे नाव असून तो ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात राहतो. करण ठाकरेवर रूग्णालयात उपचार करण्यात आले.
करण ठाकरे याने नेहमीप्रमाणे आपल्या खिशात मोबाईल ठेवला होता. अचानक त्याच्या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. यामुळे त्याच्या डाव्या पायाची मांडी भाजली. त्याला उपचारासाठी लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोट झालेला मोबाईल फोन कार्बन कंपनीचा असल्याचे एबीपी माझा या मराठी वृत्त वाहिनीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:09 pm

Web Title: mobile blast in trouser one youth injured
Next Stories
1 मुंबई पोलीस श्वान पथकातील सिझरचा मृत्यू
2 आमदारांना यंदा निम्मेच वेतन !
3 सकल मोर्चावर सवलतींचा उतारा!
Just Now!
X