25 November 2020

News Flash

मुंबईत मोबाइल चोरणाऱ्या दिल्लीतील टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

चाकरमानी आपल्या रोजीरोटीसाठी घराबाहेर पडतात आणि रेल्वेने प्रवास करतात. त्याचवेळी परराज्यातून आलेले चोरटेही लोकलच्या गर्दीच्या वेळी मोबाईल चोरण्यासाठी बाहेर पडतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात सकाळपासून चाकरमानी आपल्या रोजीरोटीसाठी घराबाहेर पडतात आणि रेल्वेने प्रवास करतात. त्याचवेळी परराज्यातून आलेले चोरटेही लोकलच्या गर्दीच्या वेळी मोबाईल चोरण्यासाठी बाहेर पडतात. गर्दीचा फायदा उचलून मोबाइल लांबवणारे दिल्लीतील दोन चोरटे गजाआड झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला आहे. हे चोरटे दोन तीन साथीदारांच्या मदतीने मोबाइल लांबवतात. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे आणि त्याचे पथक दोघा आरोपींच्या अन्य तीन साथीदारांचा शोध घेत आहे.

मुंबईत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा महत्वाच्या आणि गर्दीच्या सणांमध्ये मुंबईकरांच्या महागड्या मोबाईलवर डल्ला मारण्यासाठी दिल्लीतून चोरटे मुंबईत येतात असा मोठा खुलासा पोलीस पथकाच्या कारवाईने झाला. ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना किंवा ट्रेनमध्ये चढल्यानंतर मोबाइल गायब होतात. पण डब्ब्यात मात्र चोरटा सापडत नाही. कारण परराज्यातून आलेले दोन तीन चोरटे एकाच डब्ब्यात चढतात आणि डब्ब्यात महागडा मोबाईल असलेल्या व्यक्तीला सावज म्हणून टिपतात.

ट्रेनमध्ये चढताना मोबाइल उडविण्यास जमले नाही तर डब्ब्यात चढल्यानंतर हे चोरटे त्या सावज असलेल्या प्रवाशाच्या आजूबाजूला आणि पुढे मागे उभे राहून त्या प्रवाशाला घेरतात आणि धक्काबुक्की करतात. त्या दरम्यान तिघांपैकी ज्याला जमेल तो चोरटा मोबाईल लांबवतो आणि दुसऱ्या माणसाला देतो तो मोबाईल बंद करून तिसऱ्या माणसाला देतो. ज्याला मोबाईल मिळाला तो चोरटा घटना स्थळापासून दूर होतो.

संशय आला तरी संशयिताच्या अंग झडतीनंतर काहीही सापडत नाही. पोलीस आयुक्त नितीन कौशिक यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करीत उपायुक्त कराड आणि पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या पथकाने अखेर मोबाइल चोरट्यांना हेरले आणि या परराज्यातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा छडा लागला.

या घटनेतील फिर्यादी ज्ञानेश्वर उद्धव जगताप हे जनरल डब्ब्यात चढत असताना आरोपी हरिषकुमार अमरसिंग(३०) याने पॅन्टच्या खिशातील १७ हजाराचा मोबाइल काढून प्लॅटफॉर्म वरून पळताना आरोपी सापडला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे चार साथीदार असून ते सर्व दिल्लीत राहणारे आहेत. सणावाराला ट्रेनमध्ये गर्दी असते त्यावेळी मुंबईत येऊन मोबाइल चोरी करून दिल्लीत फरार होत असल्याचे पोलीस पथकाला समजले.

अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे दोनटाकी परिसरातील एका हॉटेलमध्ये त्याचा साथीदार सोनू रामकिशन शर्मा(२८) याला अटक करण्यात आली. ते राहत असलेल्या रूमची झाडत घेतली असता पोलिसही चक्रावले. चक्क २० महागडे मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले. याची किंमत ४ लाख ७५ हजार रुपयांचे मोबाइल हस्तगत केले. या चोरीच्या मोबाइलमध्ये आयफोन-६, विवो-४, ओपो-१, सॅमसंग-२, रेडमी-२, मी-२ आणि लेनोवो-१ आणि मोटोरोला-१ आदी मोबाइलचा समावेश होता. मोबाइल हरविल्याची तक्रार दिलेल्या ७ तक्रारदारांशी पोलिसांनी संपर्क केल्याची माहिती प्रसाद पांढरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 5:40 pm

Web Title: mobile theft cases in mumbai gang came from delhi to stole mobiles
Next Stories
1 हिंगोलीत दीड वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारुन महिलेची आत्महत्या
2 वारिस पठाण दुसऱ्या देशात असते तर काय झाले असते: नितेश राणे
3 मोदी सरकारवर निशाणा साधत राज ठाकरेंचा मनमोहन सिंगांना Happy Birthday
Just Now!
X