News Flash

गुंगीचे औषध देऊन मोबाइल चोरी करणारा अटकेत

वांद्रे टर्मिनसवर तैनात असलेल्या पोलिसांना शर्मा बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसताच त्यांना तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले.

आरोपीकडून १३ मोबाइल हस्तगत; वांद्रे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

मुंबई : गुंगीचे औषध टाकलेला चहा देऊन सहप्रवाशाला बेशुद्ध करून चोरी करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अटक के ली आहे. त्याच्याकडून १३ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपीचे नाव हमीद खान आहे.

राजस्थानमधील बिकानेर येथील आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी दीपक शर्मा यांनी ९ मार्चला वांद्रे टर्मिनस येथून जाणाऱ्या वांद्रे ते बिकानेर गाडीचे आरक्षण के ले होते. शर्मा चालू तिकीट खिडक्यांच्या समोरील एका हॉलमध्ये बसले असता एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला आणि ‘कहा जाना है’ असे विचारू लागला. तेव्हा आपण राजस्थानला जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. गाडी येण्यास वेळ असल्याचे सांगत त्या इसमाने शर्मा यांना चहा पिण्याचा आग्रह के ला. हॉलबाहेरील चहाच्या दुकानाकडे दोघे गेले आणि तेथे त्यांनी चहा घेतला. ते दोघेही चहा पिऊन पुन्हा हॉलमध्ये परतले. तेव्हा शर्मा बेशुद्ध पडले. तोपर्यंत त्यांच्याजवळील मुद्देमाल त्या इसमाने लंपास के ला. वांद्रे टर्मिनसवर तैनात असलेल्या पोलिसांना शर्मा बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसताच त्यांना तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले. काही वेळाने शुद्धीवर आलेल्या शर्मा यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कु र्ला येथे राहणाऱ्या हमीद खानला पकडले. त्याच्याकडे २ लाख ८ हजार रुपये किमतीचे १३ मोबाइल आणि अन्य मुद्देमाल सापडला.  गुंगीच्या २० गोळ्या आणि पाच ते दहा गोळ्यांची पावडरही सापडली. खान हा प्रवाशांचा विश्वास संपादन करून त्यांना चहामध्ये गुंगीचे औषध टाकू न देत होता व नंतर सर्व मुद्देमाल घेऊन पसार होत असे. त्याच्यावर अन्य काही गुन्हे आणि यात त्याचे साथीदार आहेत का याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस उपायुक्त (पश्चिम परिमंडळ) प्रदीप चव्हाण यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 1:04 am

Web Title: mobile thief arrested drugging akp 94
Next Stories
1 झोपडपट्टीत ४६ तर गृहनिमार्ण संकुलात २१ टक्के बाधित
2 मुंबईत रुग्णवाढीचा दर सरासरी ०.४२ टक्क्यांवर
3 शर्जिल चौकशीसाठी हजर झाला तर कठोर कारवाई नाही
Just Now!
X