News Flash

पावसाने दडी मारल्याने मोडकसागर तलावातील जलपातळीत घट

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशीमधून दर दिवशी ३७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

 

भातसा तलावही न भरल्याने पाणीप्रश्न कायम

मुंबई : गेले काही दिवस पावसाने ओढ घेतल्यामुळे मोडकसागर तलावातील जलपातळीत सुमारे १.२५ मीटरने घट झाली आहे. तर मुंबईकरांची तहान मोठ्या प्रमाणावर भागविणारा भातसा तलाव अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेला नाही.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशीमधून दर दिवशी ३७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. जूनमध्ये पावसाच्या तरळक हजेरीमुळे या सातही तलावांतील पाणीसाठा खालावला होता. मात्र जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे २७ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला. ऑगस्टमध्ये कोसळलेल्या संततधार पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि पालिकेची तारांबळ उडाली. मात्र तुळशीपाठोपाठ ५ ऑगस्ट रोजी विहार तलाव भरून वाहू लागला. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी मोडकसागर आणि २० ऑगस्ट रोजी तानसा तलावही ओसंडून वाहू लागले. दरम्यान पावसाने ओढ घेतल्यामुळे मुंबईमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र चार तलाव भरून वाहू लागल्याने आणि एकूणच तलावांतील जलसाठ्यात सुधारणा झाल्याने सुरुवातीला १० टक्के आणि त्यानंतर उर्वरित पाच टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून तलाव क्षेत्रात पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे मोडकसागर तलावातील जलसाठ्यात घट झाली आहे. मोडकसागर तलाव ओसंडून वाहू लागला तेव्हा त्याची पाणीपुरवठा पातळी १६३.१५ मीटर इतकी पातळी होती. ही या तलावाची पूर्ण पाणी पुरवठा पातळी आहे. मात्र पालिकेकडून उपलब्ध झालेल्या १७ सप्टेंबर २०२० च्या आकडेवारीनुसार मोडकसागरची पाणी पातळी १६१.९० मीटरपर्यंत खाली आली आहे. साधारण महिन्याभरात या तलावातील पाणी पातळी १.२५ मीटरनी कमी झाली आहे.मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी भातसामधून दर दिवशी मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात येतो. भातसाची पूर्ण पाणी पुरवठा पातळी १४२.०७ मीटर इतकी आहे. तलावाची आजची पातळी १४१.७० मीटर इतकी आहे. अगदी ०.३७ मीटर पातळी जागा तलावात शिल्लक आहे. मात्र गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाच्या लंपडावामुळे हा तलावही अद्याप भरलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:48 am

Web Title: modak sagar water supply lake no rain decrease in water level akp 94
Next Stories
1 खातेधारकांची घुसमट
2 ‘दंड न भरल्याची शिक्षा ही गुन्ह्याची शिक्षा नव्हे’
3 बंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार
Just Now!
X