News Flash

पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचे कोटय़वधी रुपये पडून

निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफासरही समितीने आपल्या अहवालात केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे गृहविभागाच्या कारभारावर ताशेरे

पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या १२१ कोटी रुपयांच्या निधीपैकी तब्बल १०५ कोटी रूपये वापराविना पडून राहिल्याने विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने गृह विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. तसेच यापुढे असा निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफासरही समितीने आपल्या अहवालात केली आहे.

लोकलेखा समितीचा सन २०१०-११ या वर्षांतील विनियोजन लेख्यांवरील अहवाल शुक्रवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. त्यात वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांसमोरील कायदा सुव्यस्थेचे आव्हान लक्षात घेता पोलिस दलाचे आधुनिकीकरण करणे अनन्यसाधारण महत्वाचे असताना आणि त्यासाठी सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला असतांनाही त्यांचा वापर न होणे ही बाब गंभीर असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.

मात्र आपल्या मागणी प्रमाणे नियोजन न करणे हे आर्थिक शिस्तीत बसत नाही. त्यामुळे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची कृती गंभीर असल्याचे मतही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यापुढे विभागाला निधी मिळताच तो खर्च करण्याची कार्यवाही सुरू करावी. अशी कार्यवाही केली नाही तर संबधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी अशी शिफासरही समितीने केली आहे.  तसेच पोलिस पाटलांची पन्नास टक्यांहून अधिक पदे रिक्त असून ती भरण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शिफासरही समितीने केली आहे.

  • पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि संगणकीकरण करण्यासाठी १२१ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र त्या वर्षांत संगणकीकरणाचे कामच होऊ शकले नाही.
  • परिणामी यातील १०५ कोटी अखर्चित राहिल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली आहे. हा अखर्चित निधी विभागाने मार्च महिना संपत असतांना परत पाठविला. मात्र ही रक्कम जर डिसेंबर महिन्यात परत पाठविण्यात आली असती तर ती अन्य विभागांना देण्यात आली असती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 2:39 am

Web Title: modernization of police forces
Next Stories
1 रिक्षा-टॅक्सी संपाला प्रमुख संघटनाचा पाठिंबा नाही!
2 निवासी अभियंत्यांना नवा मोबाइल?
3 रांगोळीने ‘खड्डे’ सजले!
Just Now!
X