News Flash

नाना पटोले यांचे टीकास्त्र

पुन्हा स्वयंपाकाचा गॅस २५ रुपयांनी महाग करून केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

Final decision on OBC reservation next Friday Nana Patole

मुंबई : केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे  स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना पुन्हा स्वयंपाकाचा गॅस २५ रुपयांनी महाग करून केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून त्याप्रमाणेच ते नागरिकांचे शोषण करीत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी के ली.

आता भाजप गप्प का- तपासे

केंद्रात यूपीए सरकार असताना एक रुपयांनी पेट्रोल-डिझेल महाग झाले तर आकांडतांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का, असा सवाल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 1:14 am

Web Title: modi center government state congress president nana patole petrol diesel expensive akp 94
Next Stories
1 निर्बंध उठवण्यासाठी ‘वाटाघाटी’चा नवा धंदा -शेलार
2 खासगी रुग्णालयात ८७ लाख ३६ हजार मात्रा
3 ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो रुग्णालयात
Just Now!
X