News Flash

मुलींनी केली मोदींची काकड आरती; जाणून घ्या पहाटे चारला झालेल्या ‘त्या’ आंदोलनाबद्दल

विद्यार्थ्यांसाठी 'मन की बात' बोलणारे माननीय प्रधानमंत्री मोदी आज गप्प का आहेत ?

पदवी व पदव्युत्तर परिक्षेची सक्ती रद्द करण्यासाठी अमेंडमेंड करावी तसेच मोदी व युजीसीला जाग येउंदे होय महाराजा , अश्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मोदींना वटहुकूम काढण्याचे आव्हान केले. त्याचबरोबर न्यु एज्युकेशन पॉलिसी चा ही विरोध करत विद्यार्थी भारती संघटना न्यु एज्युकेशन पॉलीसी ची प्रेतयात्रा काढणार आहे. जोपर्यंत वटहुकूम काढून परीक्षा रद्द होत नाहीत जीव गेला तरिही उपोषणातून माघार घेणार नाही, असे वक्तव्य विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले.

मंजिरी धुरींच्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात पहाटे 04:00 वाजता युजीसी व मोदींच्या काकड आरतीने झाली . ” मोदी व युजीसीचं डोकं ठिकाण्यावर येऊ दे रे महाराजा” अश्या घोषवाक्यांनी कार्यकर्त्यांनी आरतीची सुरुवात केली व मोदींना व युजीसीला जाग यावी यासाठी आरती करत पुन्हा एकदा परीक्षा रद्द करण्यासाठी आव्हान केले. त्यानंतर पहाटे 05:00 वाजता मंजिरी धुरी उपोषणाला स्थानापन्न झाल्या तेव्हा छत्रशक्ती संस्थेच्या सेक्रेटरी स्मिता ताई साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीतील भाषणात त्यांनी युजीसी व मोदींच्या बेजबाबदार पणाचा विरोध करत न्यू एज्युकेशन पॉलिसी चा विरोध केला व उपोषणाला बसलेल्या मंजिरी धुरीच्या धाडसाचे कौतुक केले.

विद्यार्थी भारती राष्ट्रीय संघटक शुभम राऊत तसेच विद्यार्थी भारती राज्य संघटक सिद्धार्थ कांबळे यांनी मंजिरी धुरींच्या उपोषणाला पाठिंबा देत आज साखळी उपोषण केले आहे. त्यानंतर उपोषणाचा तिसरा दिवस असला तरीही माझी ताकद कमी झालेली नसून विद्यार्थ्यांचा वाढता पाठिंबा माझी ताकदही वाढवत आहे. तसेच मोदींना राफेल आणि अयोध्ये इतकाच विद्यार्थ्यांचा विषय का महत्वाचा वाटत नाही? जे विद्यार्थी उद्याच्या देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या विषयी एकही वक्तव्य न करता त्यांच्या जीवावर टांगती तलवार ठेवणं हे धिक्कारस्पद आहे. तसेच काल विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी ट्विटर व फेसबुक live च्या माध्यमातून बोंबा मारो आंदोलन करून सरकार ला जाग आणण्याचा प्रयत्न केला , आज पहाटे काकड आरती केली . आणि अश्या अनेक गोष्टी करत राहू पण वटहुकूम काढून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण जीव गेला तरीही नाही थांबणार असे मंजिरी धुरी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 7:36 am

Web Title: modi govt new education policy student organisation in maharashtra nck 90
Next Stories
1 राज्यातील प्रमुख शहरांत ‘झोपु’ योजना; मुंबई महानगर क्षेत्रासाठी स्वतंत्र प्राधिकरण
2 माहीममधील रुग्णालयाची नोंदणी महिन्यासाठी रद्द
3 करोनाकाळात मुंबई पालिकेच्या तिजोरीतील ५९८ कोटी खर्च
Just Now!
X