News Flash

पराभव मोदींचाच – राज ठाकरे

दिल्लीतील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच पराभव असून ही लढाई मोदी विरुद्ध केजरीवाल अशीच होती असे सांगून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल

| February 11, 2015 12:13 pm

दिल्लीतील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच पराभव असून ही लढाई मोदी विरुद्ध केजरीवाल अशीच होती असे सांगून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. माटुंगा येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात केजरीवाल यांनी मिळवलेला विजय हा अभिनंदनास पात्र असल्याचे राज म्हणाले. या निवडणुकीच कोणाचे चुकले असे काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येत असतो. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात.
 सत्तेचा जो चढ असतो त्याला उतरा हा लागतोच असे सांगून हा मोदी यांचाच पराभव असल्याचे राज यांनी सांगितले. दिल्लीतील निवडणूक निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील ते आत्ताच सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2015 12:13 pm

Web Title: modi responsible for bjp defeat in delhi says raj thackeray
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 फेसबुकची मोफत इंटरनेट सेवा भारतात
2 कुंभमेळ्यासाठी झाडांच्या कत्तलीस तूर्त नकार
3 लाचखोर परवाना निरीक्षकास अटक
Just Now!
X