राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सकाळी मिथुन चक्रवर्तीची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुंबईच्या मढ भागात मिथुनचा बंगला आहे. सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळच्या सुमारास मिथुनच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेले होते.

सरसंघचालक आणि मिथुनच्या भेटीला बंगाल विधानसभा निवडणुकीची किनार आहे. ८०-९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देणाऱ्या मिथुनची लोकप्रियता आजही कायम आहे. मिथुन मूळचा बंगाली अभिनेता असून पश्चिम बंगालमध्येही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

Sunetra Pawar, Files Nomination, Baramati lok sabha seat, Ajit Pawar Announces Campaign Chiefs, mahayuti Campaign Chiefs for baramati, baramati campaign, lok sabha 2024, election 2024, baramati news, pune news, marathi news, politics news,
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर
odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?
Buldhana
बुलढाण्यात महायुतीत महाफूट, भाजप लोकसभा प्रमुखांचे बंड; उमेदवारी अर्ज दाखल
Arunachal Pradesh Assembly
निवडणुकीच्या रणसंग्रामाशिवाय आमदार अन् खासदार होणाऱ्यांची गोष्ट

मोहन भागवत यांच्याबरोबर झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया देताना मिथुन म्हणाला की, “मोहन भागवतांबरोबर मी अध्यात्मिक अंगाने जोडलो आहे. लखनऊमध्ये मी त्यांना भेटलो होतो. त्यानंतर मी त्यांना, मुंबईत आल्यानंतर एकदा माझ्या घरी भेट द्या, अशी विनंती केली होती.”

या भेटीनंतर मिथुन यांनी राजकीय पूर्नप्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे. भाजपात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “काहीही असे अंदाज लावू नका, तसे काही घडलेले नाही” असे मिथुनने सांगितले. मिथुनने यााधी नागपूरमध्ये आरएसएस प्रमुखांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरसंघचालकांना निमंत्रण दिले होते.

मिथुन चक्रवर्ती राज्यसभेत खासदार होते. बराच काळ पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेसमध्ये ते होते. २०१६ मध्ये प्रकृतीचे कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला.