18 September 2020

News Flash

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

मुंबईत विनयभंगाच्या घटना वाढतच असून मुलुंड येथेही एका सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी हर्षद उतेकर (२१) या

| December 19, 2012 06:33 am

मुंबईत विनयभंगाच्या घटना वाढतच असून मुलुंड येथेही एका सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली  आहे. मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी हर्षद उतेकर (२१) या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांला अटक केली आहे.
हर्षद उतेकर मुलुंड पश्चिमेला केशवपाडा येथे राहातो. येथे येणाऱ्या एका सात वर्षांच्या मुलीशी तो गेल्या काही दिवसांपासून अश्लील वर्तन करत होता. चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तो या मुलीला आपल्या घरात नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करीत असे. सोमवारी संध्याकाळी या परिसरातल्या लोकांनी त्याला रंगेहाथ पकडले. संतप्त जमावाने हर्षद आणि त्याच्या आई वडिलांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत हर्षदची आई गंभीर जखमी असून तिच्यावर मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलुंड पोलिसांनी हर्षदला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १० हजार रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली. पीडित मुलीची नागपाडा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 6:33 am

Web Title: molest by engineering student to minor
Next Stories
1 ‘२१ डिसेंबरला जगबुडी ही अफवा’
2 रिकॅलिब्रेट न झालेल्या वाहनांना आता प्रीपेड व्यवसाय बंदी
3 शिवाजी पार्कवर आता मातीचा स्मृती-चौथरा
Just Now!
X