News Flash

महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गायक अभिजीतविरोधात तक्रार

एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोखंडवाला येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गात्सोवाच्या मंडपात हा प्रकार घडला.

एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात हा प्रकार घडल्याची तक्रार महिलेने केली आहे. यासंबंधी ओशिवरा पोलिसांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ३४ वर्षीय महिला आपल्या मैत्रिणींसह आली होती. रात्री दहाच्या सुमारास अभिजीत आपल्या बहिणीसोबत येथे आला. त्या वेळी गर्दीचा फायदा घेत अभिजीत तिच्याशेजारी जाऊन उभा राहिला आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला.
काही वेळातच त्याने गैरवर्तन सुरू केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकाराला विरोध केला म्हणून अभिजीतने शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरडाओरडा होताच गर्दी झाल्याने महिला कार्यकर्त्यांनी त्या महिलेला मंडपाबाहेर जाण्याची विनंती केली. मात्र या महिलेने ओशिवरा पोलीस ठाणे गाठले आणि झालेला संपूर्ण प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला. यावर ओशिवरा पोलिसांनी अभिजीत आणि त्यांच्या बहिणीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2015 12:39 am

Web Title: molestation case against singer abhijeet
Next Stories
1 मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना १३,५०० रुपये बोनस
2 सांताक्रूझ चोरीप्रकरणी दोघांना अटक
3 मुख्यमंत्र्यांचा ‘गुगल हँगआऊट’ द्वारे लोकसत्ताच्या वाचकांशी संवाद
Just Now!
X