22 September 2020

News Flash

‘..अखेर मोनिकाच्या वडिलांची इच्छा पूर्ण होणार’

ग्लोबल रुग्णालयात हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

मोनिका मोरे व आई (संग्रहित छायाचित्र)

ग्लोबल रुग्णालयात हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

मुंबई : ‘अखेर मोनिकाच्या वडिलांची इच्छा पूर्ण होईल. ते आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. सगळ्या संकटातून आता सुटका होईल अशी आशा वाटते’ अशी भावना मोनिका मोरे (२४) हिच्या आईने, कविता यांनी तिच्यावर नुकत्याच पार पडलेल्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर व्यक्त केली.

जानेवारी २०१४ मध्ये रेल्वे अपघातात मोनिकाचे दोन्ही हात गेले होते. तेव्हापासून कृत्रिम हातांनी दैनंदिन व्यवहार करणाऱ्या मोनिकाला नवे हात मिळावेत यासाठी तिच्या वडिलांनी खूप धडपड केली. २०१८ मध्ये ग्लोबल रुग्णालयात हात प्रत्यारोपणासाठी नावही त्यांनी नोंदविले. तिच्या अपघातानंतर पहिल्या शस्त्रक्रियेच्या वेळेस लक्ष देत तिच्या वडिलांनी काळजी घेतली होती. जानेवारी २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले. आता तिची आईच सारी धडपड करत आहे.

अपघातानंतर सहा वर्षांनी मोनिकाच्या दोन्ही हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शुक्रवारी ग्लोबल रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. दोन्ही हात प्रत्यारोपित करणारी ही मुंबईतील पहिली शस्त्रक्रिया आहे.

चेन्नईच्या रुग्णालयात तरुण मेंदूमृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मृत्युपश्चात त्याचे हात दान केले. गुरुवारी रात्री १०.४० वाजता चेन्नईहून ग्रीन कॉरिडॉरने हात मुंबईत आणले गेले. गुरुवारी रात्री उशिरा सुरू झालेली ही शस्त्रक्रिया शुक्रवारी संध्याकाळी पूर्ण झाली. ग्लोबल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ.नीलेश सातभाई यांच्या नेतृत्त्वाखाली १२ डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली आहे. युवक प्रतिष्ठान आणि ग्लोबल रुगणालय यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया केली जात असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 2:16 am

Web Title: monica more hand transplant surgery at global hospital zws 70
Next Stories
1 अतिधोकादायक इमारतींवरील कारवाईला वेग
2 शहरांतील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी नवीन पदांची निर्मिती
3 मुंबईतील पाणीकपात पूर्णत: रद्द
Just Now!
X