रेल्वेगाडय़ा कमी असल्याचा फटका; गाडय़ा वाढवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनो रेल्वे सेवा सुरू झाली असली तरी अद्यापही मोनोला प्रवाशांची प्रतीक्षाच आहे. मोनो सेवेवर एका वेळी के वळ दोनच रेल्वेगाडय़ा कार्यरत असल्याने सुमारे अध्र्या तासाची वारंवारिता आहे. तसेच उपनगरी रेल्वेलाही याची जोडणी नाही. परिणामी घाईगर्दीच्या वेळी मोनोचा वापर करण्याकडे प्रवाशांचा कल नसल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त के ले.

मोनोचा पहिला दिवसच कार्यालयीन सुटीचा असल्याने रविवारी मोनोला प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी प्रतिसादाची अपेक्षा होती. मात्र दिवसभरात के वळ ३५० प्रवाशांनीच प्रवास के ला.

सध्या मोनो मार्गिके वर पाच रेल्वेगाडय़ा असून त्यापैकी के वळ तीनच गाडय़ा कार्यरत आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावर एका वेळी के वळ एकच रेल्वेगाडी धावत असते. एक गाडी आयत्या वेळी कार्यरत करण्यासाठी तयारीत ठेवावी लागते. त्यामुळे दोन फे ऱ्यांमध्ये सुमारे २५ ते ३० मिनिटांचे अंतर आहे. दिवसभरात ३० फे ऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुपारी ११.२४ ते दुपारी ४.०३ या काळात मोनो सेवा बंद ठेवण्यात येत आहे. या सर्व अडचणींमुळे घाईगर्दीच्या वेळी मोनोमधून प्रवास करणे फायदेशीर ठरत नसल्याने प्रवाशांनी मोनोकडे पाठ फिरवल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त के ले.

मोनो सेवेला गेल्या एक-दीड वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुटे भाग आणि रेल्वेगाडय़ांची कमतरता असल्याने ही सेवा पूर्णपणे सक्षम झालेली नाही. मोनोचे संचालन करणारी स्कोमी कं पनी दिवाळखोरीत गेल्यानंतर एमएमआरडीएने हे संचालन गेल्या वर्षी स्वत:कडे घेतले. स्कोमी कं पनीच्या कारकीर्दीत सुटय़ा भागांचा साठा, तसेच नवीन रेल्वे गाडय़ांच्या बांधणीकडे दुर्लक्ष झाले होते. मोनोचे रेखांकनदेखील जगातील अन्य मोनो रेकपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे नवीन रेकसाठी निविदा काढताना एमएमआरडीएला रेखांकनाचा खर्चही सोसावा लागला आहे. वर्षांच्या सुरुवातीच्या नियोजनानुसार जुलै २०२० पर्यंत नवीन रेक येणे अपेक्षित होते. दोन चिनी कं पन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवले होते. मात्र गलवान खोऱ्यातील घटनेनंतर त्यांच्याशी होणारा व्यवहार रद्द करण्यात आला. त्यानंतर तीन भारतीय कं पन्यांनी मोनो रेकचे उत्पादन करण्यात स्वारस्य दाखवले आहे.

सुटय़ा भागांची गरज

मोनो रेल्वेचा पहिला टप्पा वडाळा ते चेंबूर हा २०१४ मध्ये कार्यरत झाला, तर २०१९ मध्ये संत गाडगे महाराज चौक ते वडाळा हा टप्पा कार्यरत झाला. मोनो सेवेचा विस्तार झाला असला तरी सेवेची वारंवारिता वाढवण्यासाठी अधिक रेक आणि सेवा सुरळीत राहण्यासाठी सुटय़ा भागांची गरज आहे. मोनो रेल्वेची सेवा सुरू झाली, तेव्हा आठ रेक उपलब्ध होते.

सेवेकडे दुर्लक्ष

मोनोचा मार्ग हा शहरातील कोणत्याही मोठय़ा व्यवसाय कें द्र आणि उपनगरी रेल्वेसेवेला जोडणारे नाही. परिणामी करोनापूर्वकाळातही मोनोवर तुरळकच प्रवासी असायचे. जानेवारीत मोनोवर दिवसाला सुमारे १२ हजार प्रवासी प्रवास करायचे. सध्या उपनगरी रेल्वे सेवा मर्यादित असल्याने प्रवासी या सेवेचा लाभ घेतील अशी अपेक्षा होती, पण तसे होताना अद्याप दिसत नाही.