News Flash

पावसाचा कहर; भायखळा पोलीस चौकीत पाणी भरले…

पावसाचा जोर इतका होता की पावसामुळे भायखळा पोलीस ठाण्यात आतमध्ये पाणी भरले.

भायखळा पोलीस ठाणे (फोटो सौजन्य - गणेश शिर्सेकर)

उन्हाच्या काहिलीतून सुटका करणाऱ्या मान्सूनचे आज मुंबई आणि उपनगरात जोरदार आगमन झाले. काल रात्रीपासून पावसाने मुंबईला झोडपून काढले. अनेक सखल ठिकाणी पाणी भरल्यामुळे यंदाही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे बारा वाजल्याचे दिसून आले. मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला आणि मुंबई, ठाणे व राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले अशी अधिकृत माहिती हवामान खात्याने दिली. मात्र रात्रभर पावसाने हजेरी लावल्याने त्याचा मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला. पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गवरील रेल्वे गाड्या २५-३० मिनिटे उशिराने धावल्या.

मात्र, या साऱ्या गोष्टींमध्ये एका गोष्टीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे भायखळा पोलीस ठाणे. या पावसाचा जोर इतका होता की पावसामुळे भायखळा पोलीस ठाण्यात आतमध्ये पाणी भरले. तसेच, पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यातही पाणी भरले. मात्र, त्यावर तातडीनमे काहीच उपाययोजना करणे शक्य नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच पाण्यात आपले काम सुरु ठेवले. तसेच. विविध कारणांसाठी आलेल्या नागरिकांनीही याच पाण्यातून आपली वाट तुडवली.

 

फोटो सौजन्य – गणेश शिर्सेकर

 

दरम्यान, राज्यातील ज्या भागात अद्याप मान्सून दाखल झाला नाही, त्या भागात सोमवारपर्यंत मोसमी वारे पोहोचतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत मात्र शुक्रवारीच मान्सून दाखल झाला. शनिवारी सकाळी पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती, मात्र दुपारनंतर पाऊस पुन्हा बरसू लागला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. रात्रभर झालेल्या पावसाचा फटका विमान सेवेलाही बसला. मुंबईत येणाऱ्या दोन विमानांचे मार्ग खराब हवामानामुळे बदलण्यात आल्याचे समजते.

पुढील २४ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, असे हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 5:10 pm

Web Title: monsoon mumbai byculla police station waterlogged
टॅग : Monsoon
Next Stories
1 ‘त्यांचेच व्यंगचित्र त्यांच्या गळ्यात’ म्हणत राज ठाकरेंना भाजपा समर्थकाचे उत्तर !
2 मरीन ड्राईव्हवर भररस्त्यात युगूलाचे अश्लिल चाळे; महिला ताब्यात, तरुण पसार
3 Mumbai monsoon updates: अतिपावसामुळे मुंबई तुंबली; महापालिकेचे स्पष्टीकरण
Just Now!
X