मागच्या महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना घाटकोपर येथे राहणाऱ्या शीतल भानुशाली (३५) या गृहिणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई महापालिकेने घाटकोपर पोलीस ठाण्यात दुर्लक्षामुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली आहे. चार ऑक्टोबरला मुसळधार पाऊस कोसळत असताना शीतल दळण आणण्यासाठी म्हणून पीठाच्या गिरणीत गेल्या होत्या. पण त्या घरी परतल्याच नाहीत.

२४ तासांनी त्यांचा मृतदेह अरबी समुद्रात हाजी अली येथे सापडला होता. घाटकोपर असल्फा व्हिलेज येथील एका ओपन मॅनहोलजवळ शीतल यांची पिशवी सापडली. त्यामुळे मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला, असा अंदाज आहे. असल्फा व्हिलेज येथील मॅनहोलमध्ये पडल्यानंतर तब्बल २२ किमी दूर अंतरावर हाजी अलीच्या समुद्रात त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी देखील चक्रावून गेले. महापालिकेच्या अंतर्गत तपास अहवालातूनही या प्रकरणात कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

दरम्यान शीतलचे कुटुंबीय न्याय मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या विचारात आहेत. “महापालिकेने एफआयआर नोंदवला असला, तरी त्यावर आम्ही समाधानी नाही. दिवाळी सुट्टीनंतर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या विचारात आहोत. आम्हाला शीतलला न्याय मिळवून द्यायचा आहे” असे शीतलच्या एका नातेवाईकाने सांगितले.

मॅनहोलच्या बाजूला पिशवी सापडल्यामुळे शीतल मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्या असाव्यात, असा कुटुंबीय आणि पोलिसांचा अंदाज आहे. पण असल्फामधील भूमिगत ड्रेनज खूपच अरुंद असल्यामुळे मृतदेह वाहून समुद्रापर्यंत जाणं शक्य नाही, असं महापालिकेचं म्हणणं आहे.