23 January 2021

News Flash

पदोन्नती, रिक्तपदे भरण्याबाबत मंत्रालयात मासिक आढावा

राज्य सरकारचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

राज्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांची पदोन्नती आणि इतर सेवाविषयक प्रश्न तसेच, रिक्त पदे भरण्याबाबत यापुढे मंत्रालयात दर महिन्याला आढावा बैठका घेण्याचे ठरवण्यात आले आहे. या बैठका प्रशासन स्तरावर होणार आहेत.

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत मोठय़ा प्रमाणावर तक्रारी असतात. तसेच इतर विषयही वेगवेगळ्या स्तरावर हाताळले जातात. त्यांच्यात सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातच बैठका घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्यास चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मोठय़ा प्रमाणावर शासकीय पदे रिक्त पदे आहेत. रिक्त पदे पदोन्नतीने आणि सरळ सेवेने भरली जातात. सध्या नोकर भरतीवरही निर्बंध आहेत. रिक्त जागा भरल्या जाव्यात अशी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांचीही मागणी आहे. या बैठकांमध्ये गट अ ते गट ब म्हणजे वर्ग एकपासून चे चतुर्थश्रेणीपर्यंतच्या रिक्तपदांचा आढावा घेतला जाणार आहे. मंत्रालयातील संबंधित विभागांचे सहसचिव आणि उपसचिव यांनी त्याबाबत नियोजन करावयाचे आहे, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत.

या प्रश्नांचाही विचार

* अधिकारी, कर्मचारी यांची पदोन्नती

* इतर सेवाविषयक प्रश्न, रिक्त पदांवर भरती

* सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करणे

* विभागीय चौकशी, निलंबन प्रकरणे

* लोकआयुक्तांकडील प्रकरणे

* विधिमंडळात सादर करावयाचे अहवाल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:01 am

Web Title: monthly review in the ministry regarding promotion filling of vacancies abn 97
Next Stories
1 मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण लवकरच निश्चित करणार
2 राजकीय स्वार्थासाठी केंद्राकडून सीबीआयचा वापर
3 एमपीएससी परीक्षेतील यशवंत नियुक्तीच्या प्रतीक्षेत
Just Now!
X