वाढीव वीज बिलांविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाच्या महिला आघाडीतर्फे मुंबईतल्या महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. अनवाणी पायांनी भाजपाच्या महिला आघाडीने मुंबईतील प्रकाशगडावर मोर्चा काढला आहे. हे सरकार प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे, जनतेला फसवून हे सरकार बसलं आहे अशी टीका महिला आघाडीच्या नेत्या रितू तावडे यांनी केली आहे. प्रकाशगड या ठिकाणी पोहचूनही भाजपाच्या महिला आघाडीने सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

ग्राहकांवरचा वाढीव वीज बिलांचा भार आहे. त्यात सरकारने कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे भाजपाने सरकारविरोधात मोर्चा काढला आहे. महावितरणच्या कार्यालयावर भाजपाने मोर्चा काढून सरकाविरोधी घोषणाबाजी केली. लॉकडाउनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिलं आली. या बिलांमधून दिलासा देण्याची मागणी होत होती. सुरुवातीला उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यातून दिलासा मिळेल असं म्हटलं होतं. मात्र नंतर त्यांनी यू टर्न घेत कोणताही दिलासा ग्राहकांना मिळणार नाही जी वीज वापरली आहे त्याचं बिल भरावंच लागेल अशी भूमिका घेतली. यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे.

आणखी वाचा- भाजपा राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करणार – चंद्रकांत पाटील

वाढीव वीज बिलांमधून दिलासा मिळेल असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्राहकांनी वीज वापरली आहे त्यामुळे आलेले बिल हे भरावेच लागेल असं म्हटलं आहे. तसंच कोणताही दिलासा मिळणार नाही असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे भाजपा आता सरकारविरोधात आक्रमक झाली असून भाजपाच्या महिला आघाडीने आज प्रकाशगड या महावितरणच्या कार्यालयावर अनवाणी मोर्चा काढला.