News Flash

Coronavirus : सोलापूर, मिरज, पुणे या ठिकाणी नव्या लॅब उभारण्यात येणार-राजेश टोपे

मुंबईतही लॅब उभारण्यात येणार असल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं

छायाचित्र-गणेश शिर्सेकर

करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोलापूर, मिरज, पुणे या ठिकाणी नव्या लॅब उभारण्यात येतील. मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयातही नवी लॅब उभारली जाईल अशी महत्त्वाची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कस्तुरबा रुग्णालयाला आणि सेव्हन हिल्स रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कस्तुरबा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये एकूण ८० संशयित दाखल आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. तसंच करोनाग्रस्तांची संख्या वाढली तरीही घाबरुन जाऊ नका असंही त्यांनी म्हटलं आहे.

कस्तुरबा गांधी रुग्णालयातील बेड्सची क्षमता १०० पर्यंत केली जाणार आहे. तसेच करोनाच्या तपासणी लॅबची संख्याही वाढवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशात करोनाग्रस्त आढळत आहेत. मात्र महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे लॅब उभारणं आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत एक लॅब तसेच पुणे, मिरज आणि सोलापूर या ठिकाणीही लॅब उभारण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३२ वरुन ३३ वर गेली आहे कारण कल्याणमध्ये आणखी एक करोनाग्रस्त आढळला आहे. या रुग्णावरही उपचार सुरु आहेत. संख्या वाढली तरीही नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. सरकारतर्फे करोनाचा सामना करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. सेव्हन हिल्स रुग्णालयातही ५०० बेड्स वाढवले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 5:02 pm

Web Title: more labs in pune solapur and miraj as well as in mumbai for corona virus test says rajesh tope scj 81
Next Stories
1 Coronavirus : पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा
2 अजित पवारांनी दिली कर्जमाफीची आकडेवारी : आतापर्यंत ११,४६८ कोटी केले खात्यात जमा
3 औरंगाबादमध्ये आणखी एक महिला करोनाग्रस्त, राज्यातली संख्या ३२ वर
Just Now!
X