22 September 2020

News Flash

राज्यात रुग्णवाढीचा नवा उच्चांक

चोवीस तासांत ११ हजारांपेक्षा अधिक बाधित

संग्रहित छायाचित्र

मुंबई आणि उपनगरांतील करोना संसर्गाचा वेग गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात येत असला, तरी राज्यातील रुग्णवाढ अद्याप थांबलेली नाही. गेल्या २४ तासांत राज्यात ११,१४७ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, आतापर्यंतचे हे सर्वाधिक रुग्ण आहेत. एका दिवसात करोनामुळे २६६ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे.

एका दिवसात ११ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळणे हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. याआधी गेल्या बुधवारी १०,५७६ रुग्ण आढळले होते. एका दिवसात १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळणारे महाराष्ट्र हे आतापर्यंत एकमेव राज्य ठरले. रुग्णसंख्येचा वाढता आलेख हा राज्यासाठी धोक्याचा इशारा मानला जातो.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आरोग्य खात्याने वर्तविली आहे. चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा आरोग्य खात्याकडून के ला जातो. गेल्या २४ तासात मुंबई (१२०८), पुणे (१८८९), पिंपरी-चिंचवड (९८७), नाशिक (३१९), ठाणे (२४२), नवी मुंबई (३७३), कल्याण-डोंबिवली (३५७), वसई-विरार (२६६) रुग्ण आढळले.

स्थिती काय?

राज्यात आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले असून १४,७२९  जणांचा मृत्यू झाला. देशात सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू हे महाराष्ट्रातच झाले आहेत. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण हे तमिळनाडूत आढळले आहेत. राज्यात १ लाख ४८ हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ४८,८१५ रुग्ण आहेत.  मुंबईत २०,१५८, तर ठाणे जिल्ह्य़ात ३१,९२३ रुग्ण आहेत.

देशात ५२,१२३ नवे रुग्ण

देशातही करोना रुग्णवाढीने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत करोनाचे ५२,१२३ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजार ७९२ वर पोहोचली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ७७५ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३२ हजार ५५३ रुग्ण करोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख २० हजार ५८२ झाली आहे. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६४.४४ टक्के आहे. मृतांची एकूण संख्या ३४ हजार ९६८ वर पोहोचली आहे. देशभरात ५ लाख २८ हजार २४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  समूह प्रतिकाराच्या पर्यायाने करोना आटोक्यात आणणे शक्य नसून, लसीकरण हा एकमेव उपाय आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:16 am

Web Title: more than 11000 affected in 24 hours in the state abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 निर्बंधांसह उपाहारगृहे सुरू करण्याच्या मागणीस जोर
2 एक लाख शेतमजुरांना कौशल्यविकास प्रशिक्षण
3 वीज नियामक आयोगापुढे भाजपची याचिका
Just Now!
X