24 September 2020

News Flash

मुंबईतील एक लाखाहून अधिक रुग्ण करोनामुक्त

दिवसभरात ५० जणांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईमधील ९२३ रुग्ण बुधवारी करोनामुक्त झाले असून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. बुधवारी एक हजार १३२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले असून, दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला.

मुंबईमधील करोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ८६ दिवसांवर पोहोचला असून करोना रुग्णवाढीचा दर ०.८१ टक्के झाला आहे. आजघडीला मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या एक लाख २६ हजार ३७१ वर पोहोचली आहे. यापैकी एक लाख ७० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्तांचे प्रमाण ७९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण सहा हजार ९४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी मृत्यू झालेल्या ५० जणांमध्ये ३० पुरुष, तर २० महिलांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांपैकी तिघांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी आहे, तर ३० जणांचे वय ६० वर्षांहून अधिक मोठे, तर १७ जण ४० ते ६० वयोगटातील होते. आजघडीला मुंबईत १९ हजार ६४ उपचाराधीन रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात १,३६८ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी १ हजार ३६८ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्या १ लाख १ हजार ५७६ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्य़ातील एकूण मृतांची संख्या २ हजार ८७३ इतकी झाली आहे.

बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील ४०७, कल्याण-डोंबिवलीतील ३६८, ठाणे शहरातील १९९, मीरा-भाईंदरमधील १७८, ठाणे ग्रामीणमधील ६९, बदलापुरातील ५७, अंबरनाथमधील ४४, उल्हासनगरमधील २७ आणि भिवंडीतील १९ रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात दिवसभरात १२,७१२ रुग्ण : राज्यात करोनाचे १२,७१२ नवे रुग्ण आढळले असून, दिवसभरात ३४४ जणांचा मृत्यू झाला. पुणे, कोल्हापूर, नगर, नाशिक या जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत १३,४०८ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. राज्यात १ लाख ४८ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यातील मृतांची संख्या १८,६५० झाली. दिवसभरात पुणे १६६५, पिंपरी-चिंचवड ९४८, कोल्हापूर जिल्हा ६००, नाशिक शहर ८१६, नगर जिल्हा ६२५, जळगाव ३५३ रुग्णांचे निदान झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 12:26 am

Web Title: more than one lakh patients in mumbai are corona free abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पोलीस तक्रार प्राधिकरणे कागदावरच
2 आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना पुन्हा सुरू
3 शाळा, प्रार्थनास्थळे खुली करण्यास मंत्री उत्सुक
Just Now!
X