News Flash

राज्यात दोन लाखांपेक्षा अधिक करोनाबाधित

२० दिवसांत एक लाख रुग्ण वाढले

राज्यात दोन लाखांपेक्षा अधिक करोनाबाधित
संग्रहित छायाचित्र

राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ही दोन लाखांपेक्षा अधिक झाली आहे. करोनाची बाधा झाल्यावर ९८ दिवसांत राज्यात एक लाख रुग्णसंख्या झाली होती. पुढील लाख रुग्णांची संख्या ही अवघ्या २० दिवसांमध्ये वाढली आहे.

राज्यात करोनाची बाधा झाल्यापासून रुग्णवाढीचा दर कमी होता, पण गेल्या २० दिवसांमध्ये तो वेगाने वाढला. अवघ्या २० दिवसांमध्ये एक लाखापेक्षा अधिक रुग्णांच्या संख्येत भर पडली. गेल्या २४ तासांत राज्यात ७,०७४ रुग्णांची नोंद झाली. दोन दिवस सहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले होते, पण गेल्या २४ तासांत हा आकडा सात हजारांपेक्षा जास्त आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यात करोनामुळे २९५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८६७१ रुग्ण दगावले आहेत.

राज्यात सध्या ८३२९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई (२४९३६), ठाणे जिल्हा (२६७२७), पुणे जिल्हा (१३०५१) रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

गेल्या २४ तासांत पुणे महापालिका हद्दीत ११२० रुग्णांना निदान झाले. पुणे शहरात एवढे रुग्ण पहिल्यांदाच आढळले आहेत. कल्याण-डोंबिवली (६३३), ठाणे (३७९), नवी मुंबई (२७१), उल्हासनगरमध्ये २२४ रुग्णांचे निदान झाले.

मुंबईत १,१८० नवे रुग्ण

* शनिवारी मुंबईत १ हजार १८० नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६८ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या ८२ हजारांच्या पुढे गेली असून, एकूण मृतांचा आकडा ४,८२७ वर पोहोचला आहे. मृत्युदर ५.८ टक्क्यांवर कायम आहे.

* शनिवारी १,०७१ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ५३,४६३ म्हणजेच ६४ टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २४ हजार ५२४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

* शुक्रवारपेक्षा सक्रिय रुग्णांची संख्या शनिवारी ४१ ने वाढली आहे. आणखी ९६६ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:57 am

Web Title: more than two lakh corona affected in the state abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘सेरो’ सर्वेक्षणासाठी सहकार्य करा; पालिकेचे आवाहन
2 दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रती आता ई-मेलवर
3 दोन किलोमीटरची अट मागे घेण्याबाबत पोलिसांचे मौन
Just Now!
X