News Flash

नाताळसाठी कोकण रेल्वेची जादा गाडी

नाताळ सणासाठी गोव्यामध्ये जाणाऱ्या मोठय़ा पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने २४ ते ३१ डिसेंबर या आठ दिवसांसाठी या मार्गावर वांद्रे-मडगाव-वांद्रे ही एक जादा गाडी

| December 21, 2013 02:32 am

नाताळ सणासाठी गोव्यामध्ये जाणाऱ्या मोठय़ा पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने २४ ते ३१ डिसेंबर या आठ दिवसांसाठी या मार्गावर वांद्रे-मडगाव-वांद्रे ही एक जादा गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी या भरधाव गाडीला जादा डबे जोडले जाणार आहेत.
नाताळनिमित्ताने गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षांनुवर्षे वाढत आहे. ते लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंगळवार २४ डिसेंबरपासून वांद्रेहून रात्री सव्वाबारा वाजता एक नाताळ विशेष गाडी सोडली जाणार आहे. ती मडगावला त्याच दिवशी दुपारी साडेबाराला पोहचणार आहे तर मडगावहून ही गाडी रात्री आठ वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 2:32 am

Web Title: more train for christmas from konkan railway
Next Stories
1 पाच हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अटकेत
2 आर्थिक गाडा चालविण्यासाठी दर महिन्याला कर्जाची कसरत
3 ‘उल्हासनगर पॅटर्न’ उल्हासनगरमध्येच अपयशी
Just Now!
X