News Flash

आणखी पाणीकपात?

दमदार हजेरी लावल्यानंतर गायब झालेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. दिवसेंदिवस पाणीसाठा आटू लागल्याने पाणी कपातीत आणखी वाढ करण्याचा विचार पालिका प्रशासन

| July 7, 2014 03:58 am

दमदार हजेरी लावल्यानंतर गायब झालेल्या पावसामुळे मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. दिवसेंदिवस पाणीसाठा आटू लागल्याने पाणी कपातीत आणखी वाढ करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. मात्र १५ जुलैपर्यंत पावसाची वाट पाहून पाणी कपात वाढविण्याचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
दर दिवशी मुंबईला ३७०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस हजेरी लावतो आणि मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठय़ात भर पडते. मात्र यंदा जूनमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने महापालिकेला २० टक्के पाणी कपात करणे भाग पडले. जुलैमध्ये दमदार पावसाने सुरुवात केल्यावर पाणी प्रश्न सुटेल असे सुरुवातीचे दोन दिवस वाटत होते. मात्र अचानक पावसाने दडी मारली आणि पुन्हा एकदा मुंबईकरांच्या पाण्याच्या प्रश्नाने पालिका अधिकारी चिंतीत झाले आहेत.
जुलैमध्ये सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे तलावांतील जलसाठय़ात फारसा फरक पडलेला नाही. उलटपक्षी पाण्याची पातळी खाली घसरू लागली आहे. तथापि, पाऊस पडेल आणि प्रश्न सुटेल असे पालिका अधिकाऱ्यांना वाटत आहे. येत्या १५ जुलैपर्यंत पावसाचा लपंडाव सुरुच राहिला तर मात्र पाणी कपातीमध्ये आणखी वाढ करावी लागणार आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 3:58 am

Web Title: more water cut in mumbai 2
Next Stories
1 डॉक्टर अद्यापही संपावर ठाम
2 ‘कॅम्पाकोला’वर पुढील कारवाई लवकरच
3 वीजचोरीविरोधातील ‘महाराष्ट्र मॉडेल’चे मोदींकडून कौतुक
Just Now!
X