18 October 2019

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

कोसळलेल्या पुलाची जबाबदारी मुंबई महापालिकेने स्वीकारली, न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार आणि वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या..

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1. बेपर्वाईचे बळी.. ‘सीएसएमटी’स्थानकाला जोडणारा पूल कोसळून ६ मृत्युमुखी, ३० जखमी

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३० जण जखमी झाले. वाचा सविस्तर..

2.कोसळलेला पूल आमचाच, टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी सुरु होती. वाचा सविस्तर..

3.पुलांच्या संरचनात्मक तपासणीबाबत प्रश्नचिन्ह!

अंधेरी येथील पादचारी पुलाच्या दुर्घटनेला एक वर्षही पूर्ण झाले नसताना दक्षिण मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात जाणारा दादाभाई नौरोजी मार्गावरील पादचारी पुलाचा मोठा भाग कोसळल्यामुळे पालिकेने केलेल्या मुंबईतील पुलांच्या संरचनात्मक तपासणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर..

4.पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा – नितेश राणे

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. आमदार नितेश राणे यांनी यानिमित्ताने शिवसेनेवर टीका करत पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा असा टोला लगावला आहे. वाचा सविस्तर..

5. न्यूझीलंडमधील गोळीबारात थोडक्यात बचावले बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू

न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. वाचा सविस्तर..

First Published on March 15, 2019 9:40 am

Web Title: morning bulletin mumbai bridge collapse new zealand firing and other news