१) ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं वयाच्या ६३ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती. वाचा सविस्तर

२) गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याच्या संशायवरुन अटक करण्यात आलेल्या कर्नाटक शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यानेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना प्रशिक्षण दिल्याची सुत्रांची माहिती आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. वाचा सविस्तर

३)  ‘जिओ’मुळे अनेक नामांकित राष्ट्रीय मोबाइलसेवा कंपन्यांचे जगणे आणि तगणे कठीण झाले असतानाच सर्वसामान्यांच्या घरात विविध दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इंटरनेट सेवा पुरवणारे केबल चालकही बेकारीच्या भीतीने धास्तावले आहेत. या व्यवसायात लाखो तरुण असून त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती असल्याने जिओविरोधात त्यांचा संघर्ष अटळ झाला आहे. वाचा सविस्तर

४) घातपात, अतिरेकी कारवायांसाठी अटकेत असलेल्या संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी राज्यभरात असंख्य तरुणांची माथी भडकावली, त्यांच्यात कट्टरवाद भिनवला. हे आरोपी आपल्या भविष्यातील कटकारस्थानांमध्ये माथी भडकलेल्या काही तरुणांचा वापर करून घेणार होते, अशी माहिती तापासयंत्रणांना मिळाली आहे. वाचा सविस्तर

५) आशियाई क्रीडा  स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय नौकानयनपटूंने धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाने ६:१७:१३ अशी आश्वासक वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं सुवर्णपदक ठरलं आहे. वाचा सविस्तर 

राज्य-देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांसह दिवसभरातील सर्व बातम्यांचेअपडेट्स तुम्ही लोकसत्ता.कॉमवर पाहू शकणार आहात. क्लिक करा