News Flash

Coronavirus Outbreak : वाढत्या मृत्यूदराची चिंता

मुंबईच्या २० वॉर्डातील मृत्यूदर देशाच्या तुलनेत जास्त; चेंबूर-गोवंडी भागातील १० टक्के रुग्णांचा मृत्यू

मुंबईच्या २० वॉर्डातील मृत्यूदर देशाच्या तुलनेत जास्त; चेंबूर-गोवंडी भागातील १० टक्के रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये धारावी, वरळी अशा दाटीवाटीच्या भागांत करोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यात पालिके ला यश आले असले तरी अनेक भागांत १० टक्यांच्या आसपास असलेला मृत्यूदर खाली आणण्याचे मोठे आव्हान पालिके समोर आहे. मुंबईचा एकूण मृत्यूदर ५.७ टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र तब्बल १३ वॉर्डाचा मृत्यूदर मुंबईच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. या सर्वाधिक १० टक्के इतका मृत्यूदर चेंबूर-गोवंडी भागांत आहे.

मुंबईत आतापर्यंत ४६२९ रुग्णांचा करोनाबळी गेला आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या वेगाने वाढत होती त्या काळातही मृत्यूदर ३.३ टक्क्यांवर ठेवण्यात पालिकेला यश आले होते. मात्र मार्चपासून विविध रुग्णालयांत झालेल्या ८६२ मृत्यूंची नोंद १७ जूननंतर पालिकेच्या अहवालात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर दररोज ५० ते १०० जुन्या करोनाबळींची संख्या मृतांच्या आकडेवारीत समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे या महिन्याभरातच मृतांचा आकडा सुमारे ३०००ने वाढला आहे. त्यामुळे मुंबईचा मृत्यूदर ५.७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. देशाचा मृत्यूदर ३ टक्के आणि राज्याचा मृत्यूदर ४.५ असताना मुंबईतील मृत्यूदर मात्र

भयावह पद्धतीने वाढतो आहे. पालिकेच्या २४ वॉर्डापैकी २० वॉर्डाचा मृत्यूदर तर देशाच्या मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे.

पालिकेच्या साथ सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या विभागवार आकडेवारीनुसार मुंबईच्या काही भागांत हा दर बऱ्यापैकी आटोक्यात आहे.  दहिसर, मालाड, कांदिवली, मुलुंड, कुलाबा या भागांतील मृत्यूदर हा तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. बाकी सर्व भागांमध्ये मृत्यूदर ३ टक्क्यांच्या पुढे आहे. तर उर्वरित अंधेरी पूर्व, दादर, माहीम, धारावी, भांडुप, कुर्ला, वरळी, वांद्रे पूर्व, शीव-वडाळा, भायखळा, देवनार-मानखुर्द, गोरेगाव, चेंबूर-गोवंडी, वांद्रे पश्चिम, मशीद बंदर सर्व भागांत मृत्यूदर खूप जास्त आहे.

जास्त मृत्यूदर असलेल्या भागांमध्ये चेंबूर, गोवंडी या भागाचा पहिला क्रमांक लागतो. या भागाचा मृत्यूदर १० टक्के इतका आहे. त्याखालोखाल वांद्रे पूर्वमध्ये ८.७ टक्के आणि डोंगरी, मशीद बंदर भागात ८.१६ टक्के इतका आहे.

दरम्यान, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे दीर्घ आजार हेच मृत्यूदर जास्त असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचे मत विभाग अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

रुग्ण कमी, मृत्यूदर जास्त

मुंबईतील डोंगरी, मशीद बंदर, उमरखाडी या बी विभागात सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. या भागात आतापर्यंत तुलनेत कमी म्हणजे फक्त ७२२ रुग्ण बाधित झाले आहेत. मात्र इथे मृत्यू दर ८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या भागात वृद्धांची किंवा ६० वर्षांवरील लोकांची संख्या जास्त आहे, हेही त्यामागील एक कारण आहे. मात्र आता या भागातील रुग्णवाढीचा दर १ टक्क्यापेक्षाही खाली असल्याची प्रतिक्रिया बी विभागाचे साहाय्यक आयुक्त नितीन आर्ते यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 4:33 am

Web Title: mortality rate in 20 wards of mumbai is higher than the rest of the country zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 प्रवासासाठी नागरिकांकडून दुचाकीला पसंती
2 ग्राहक न्यायालयांचे आभासी कामकाज कायद्याच्या कचाटय़ात
3 अवाजवी शुल्कप्रकरणी ‘नानावटी’वर गुन्हा
Just Now!
X