21 September 2020

News Flash

धारावीत मृत्यूदरही आटोक्यात

गेल्या दहा दिवसांत एकही मृत्यू नोंद नाही

डॉ. निशांत कुमार यांनी जेजे रुग्णालय व एका फाऊंडेशनच्या सहकार्यानं काही कर्मचाऱ्यांवर प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) पाहणी केली होती. ज्यात असं दिसून आलं की, प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) कमी होत जातात.

गेल्या दहा दिवसांत एकही मृत्यू नोंद नाही

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे. त्याच वेळी जून, जुलैपासून करोनाबाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही घसरले असून ऑगस्टच्या १० दिवसांत येथे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. माहीममध्ये प्राणवायूसह  उपलब्ध केलेल्या खाटांच्या सुविधेमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

१ एप्रिल रोजी दाटीवाटीच्या झोपडय़ा आणि चाळी असलेल्या धारावीमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. यामुळे पालिका अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. धारावीमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन दाटीवाटीच्या वस्त्यांमुळे होणे शक्यच नव्हते. त्यामुळे तात्काळ दोन ठिकाणी करोना काळजी केंद्रे उभी करण्यात आली. करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना या केंद्रांमध्ये पाठविण्यास सुरुवात झाली. तर घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी, खासगी डॉक्टर आणि पालिकेच्या दवाखान्यांमध्ये सुरू केलेली तपासणी, मोबाइल दवाखाने, तपासणी शिबीर आदी विविध उपाययोजनांमुळे धारावीमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात येऊ लागली आहे.

दरम्यानच्या काळात माहीम येथील निसर्ग उद्यानासमोर २०० खाटांचे करोना आरोग्य केंद्र उभारण्यात आले. येथील सर्व खाटांना प्राणवायूची व्यवस्था करण्यात आली. यामुळे करोनामुळे प्रकृती बिघडणाऱ्या रुग्णांना तेथे तात्काळ प्राणवायूची व्यवस्था करता आली. यामुळे धारावीमधील मृत्यू दरही कमी होऊ लागला आहे. धारावीमध्ये आतापर्यंत दोन हजार ६१७ जणांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी दोन हजार २७१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर  एकूण २५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६७ रुग्णांचा मृत्यू एप्रिलमध्ये झाला होता. तर मे महिन्यात तब्बल १५४ धारावीकरांना करोनामुळे प्राण गमवावे लागले होते. मात्र निसर्ग उद्यानासमोर जूनमध्ये करोना आरोग्य केंद्र उभारल्यानंतर मृत्यूचे प्रमाण घसरू लागले. जूनमध्ये ३१ जणांचा, तर जुलैमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत धारावीतील एकही रुग्ण दगावलेला नाही. आजघडीला धारावीमध्ये ८८ सक्रिय रुग्ण आहेत.

२,६७१ धारावीतील एकूण बाधित रुग्ण

१५,९८० अतिजोखमीचे संशयित रुग्ण

४८,६८८ कमी जोखमीचे संशयित रुग्ण

४७,३५८ गृह विलगीकरणात

१५,२८१ संस्थात्मक विलगीकरणात

२,२७१ बरे झाले

८८ सक्रिय रुग्ण

२५६ मृत्यू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 2:56 am

Web Title: mortality rate in dharavi is also under control zws 70
Next Stories
1 करोना रुग्णांच्या प्रकृतीबाबत नातेवाईकांना माहिती
2 पाच वर्षांत २४ हजार वृक्ष दुर्घटनाग्रस्त
3 ‘जीएसटी’ अधीक्षकाला दोन लाखांचा गंडा
Just Now!
X