26 October 2020

News Flash

रुग्णालयातील बहुतांश मृत्यू मध्यरात्री १ ते पहाटे ५ दरम्यान

करोना मृत्यूदर कमी करण्यासाठी मुंबई पालिकेचा कृती आराखडा

प्रतिकात्मक छायाचित्र

गंभीर रूग्णाच्या खाटेजवळ मलमात्र नसणे, त्याला गरज लागल्यास ते देणारी व्यक्ती आसपास नसणे अशी कारणे रूग्णालयातील करोनाबाधितांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक गंभीर रुग्णाला एक मलपात्र पुरवण्याची व्यवस्था करावी, अशी मुलभूत सूचना पालिका आयुक्तांना करावी लागली आहे.

मुंबईतील ५७ टक्के रुग्ण करोनामुक्त झालेले असले तरी मृत्यूदर गेल्या काही दिवसात ५.८ टक्कय़ांवर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत ४४६१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यात ५० वर्षांवरील रुग्णांचा मोठय़ा संख्येने समावेश आहे. त्यात रूग्णालयातील अनेक मृत्यू मध्यरात्री एक ते पहाटे पाच या वेळेत झाल्याचे दिसून येते. या वेळी रुग्ण शौचालयात जाण्यासाठी ऑक्सिजनचे यंत्र काढून ठेवतात आणि ऑक्सिजन पुरवठय़ाअभावी मृत्यू होत आहे. हे मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णाजवळ एक मलपात्र असणे आवश्यक आहे. किमान ४ बेड समवेत एक शौच कुप असावे. कार्डबोर्डपासून बनवलेले मलपात्र देखील वापरले जाऊ शकते. याबाबत प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने ‘प्राण वाचवा कृती आराखडा’ तयार केला असून त्यात ही सूचना करण्यात आली आहे.

मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजनसहीत खाटा, अतिदक्षता उपचार, जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) अशा सुविधा रुग्णालयात असतात. सोबत  परिणामकारक औषध पुरवठा करुन, रक्तद्रव चाचणी पद्धतीचा उपयोग करुन रुग्णसेवा करण्यात येत आहे. मात्र तरीही मृत्यूदर वाढतो आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड मृत्यूदर आणखी कमी व्हावा यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका सांघिक कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे.

कृती आराखडा

* मध्यम आणि तीव्र स्वरूपाची बाधा असलेला प्रत्येक रुग्ण हा डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांची सांघिक जबाबदारी असतील.

* अशा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत वरिष्ठ आणि कनिष्ठ यांनी दिवसातून किमान दोन वेळा व्हिडिओ किंवा टेलिफोनच्या  माध्यमातून संपर्कात राहणे बंधनकारक असेल.

* अशा रुग्णाची करोना उपचारांसह संपूर्ण पूरक काळजीही घेतली गेली पाहिजे.

विषाणू रोधी (अ‍ॅण्टीव्हायरल), स्टिरॉइड, प्लाझ्मा यासह औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करावी आणि त्यांचा योग्य उपयोग करावा, असेही आयुक्तांनी या निर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:19 am

Web Title: most hospital deaths occur between 1am and 5am abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 वीजदेयक एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना दोन टक्के  सवलत
2 शुल्करचनेत हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नाही!
3 ऑनलाइन अध्यापन मार्गदर्शन वर्गाचे पेव
Just Now!
X