20 October 2020

News Flash

मुलीची हत्या करून मातेची आत्महत्या

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून विधवा मातेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप मृतदेहाजवळ सापडलेल्या

| July 13, 2013 04:46 am

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून विधवा मातेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीत करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी ही मन सुन्न करणारी घटना घडली. वर्षभरापूर्वी तिच्या पतीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता.
चेंबूर येथील टिळकनगर परिसरातील इमारत क्रमांक ८७ मध्ये षन्मुगेश्वरी ऊर्फ इंदिरा बालसुब्रमण्यम यादव (३२) ही पोनूशक्ती या मुलीसह सासू-सासऱ्यांसह राहत होती. तिचे सासरे वृत्तपत्र विक्रेते असून शुक्रवारी दुपारी स्टॉल बंद करून घरी आले. दार ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी शेजारच्यांकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी पोनूशक्ती निपचित पडलेली आढळून आली तर सुनेचा मृतदेह पंख्याला लटकत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने शेजारच्यांच्या मदतीने दोघांना राजावाडी रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उशीने मुलीचे तोंड दाबून हत्या केल्यानंतर षन्मुगेश्वरी यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.  या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 4:46 am

Web Title: mother kills daughter commits suicide
Next Stories
1 आरक्षणप्रश्नी संघर्ष टाळण्यासाठी आता.. ‘मराठा – ओबीसी समन्वय समिती’
2 डोंबिवलीमध्ये घरात घुसून महिलेवर बलात्कार
3 केंद्रांवर भाजी पुरविताना सरकारच्या नाकी नऊ
Just Now!
X