चतुरंग प्रतिष्ठान आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून ‘शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग’ या नव्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी आवश्यक असलेले अभ्यास, लेखन, निरीक्षण, वाचन कौशल्य, शिक्षणतज्ज्ञांचे अनुभव कथन, कृतीसत्र, प्रकल्प पद्धती, अध्ययन साहित्य निर्मिती, वर्ग व्यवस्थापन तंत्र, नेतृत्व विकसन, ध्येयवृत्ती जोपासना अशा विविध विषयांवर शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या वर्षीचा प्रशिक्षण वर्ग प्राधान्याने ५ वी ते १० वीच्या माध्यमिक शिक्षकांसाठी होणार असून जून महिन्याची सुरुवात, दिवाळीची सुट्टी व एप्रिल महिना अखेर अशा तीन टप्प्यात १६ ते १८ दिवसांसाठीचा हा निवासी वर्ग असणार आहे. पहिल्या प्रशिक्षण वर्गात रत्नागिरी जीवतील २२ शाळांमधील निवड करण्यात आलेले ४० शिक्षक सहभागी होणार आहेत.